शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाव्यतिरिक्त थकीत रक्कम कशी भरावी?, शेतकरी कर्जमाफीच्या पात्रता निकषांबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:17 IST

छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे.

उरुळी कांचन : छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. या योजनेत थकबाकी भरून कर्जमाफीस पात्र ठरण्यास शेतकºयांकडे काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. मात्र, या योजनेत कुटुंबातील किती खातेदारांना पात्र ठरविले जाणार, याची योग्य माहिती कोणताही अधिकारी उपलब्ध करून देत नसल्याने शेतकºयांच्या मनात थकीत रक्कम भरण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा सुरुवातीचा अध्यादेश काढला होता. कालांतराने कर्जमाफीची व्याप्ती वाढवून १ एप्रिल २००१ पासून ते ३१ मार्च २००८, १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६, १ जून २०१६ व त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत टप्प्याटप्प्याने कर्जाची माहिती मागविली आहे.दरम्यान थकीत असलेल्या शेतकºयांना दीड लाख व कर्ज मुदतीत परतफेड करणाºयांना २५ हजार प्रोत्साहन अनुदान या निकषानुसार लाभार्थी पात्र ठरविले आहेत. नंतर कौटुंबिक मर्यादा व्याप्ती आणखी वाढवून पती व पत्नीच्या नावे दीड लाख रुपये थकीत कर्ज असल्यास, अशा कुटुंबीयांना लाभ देण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार लाभार्थ्यालादीड लाखावरील थकीत कर्ज भरण्यासाठी शासनाने तिसºयांदा मुदतवाढ दिली, ती ३० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र, राज्य सरकारने सुधारित अध्यादेश काढला. त्यानुसार जिल्हा बँका, सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका या वित्तीय संस्थांकडून अध्यादेशात किमान कुटुंबातील किती व्यक्तींना योजनेत लाभार्थी करण्यात येईल, याची स्पष्ट माहिती संबंधित संस्थांच्या अधिकाºयांकडून मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. कर्जमाफीसाठी कर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येऊन ठेपल्याने कर्जमाफी हुकते की काय, या भीतीने शेतकरीवर्गधास्तावला आहे.पती, पत्नी व अल्पवयीन मुलेच पात्र : कटकेया संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) अनंत कटके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने ठरविलेल्या निकषानुसार एका कुटुंबाला लाभ मिळण्यासाठी पती, पत्नी व दोन अल्पवयीन (१८ वर्षांखालील) मुले यांच्यासाठी कर्जमाफीचा नियम ग्राह्य धरण्यात आला आहे.कुटुंबातील एक व्यक्ती, पत्नीव्यतिरिक्त इतर सज्ञान व्यक्ती असल्यास ते कौटुंबिक नियमाच्या अंतर्गत येणार नाहीत. कर्जमाफीची थकबाकी भरणा करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३० सप्टेंबरपर्र्यंत मुदतीत लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.अधिकाºयांकडून केवळ थकीत रकमेची माहिती देणे अथवा खात्यावरील रक्कम भरून घेणे याव्यतिरिक्त अधिक माहिती मिळत नसल्याने या कर्ज खात्यावरील दीड लाख रुपये माफ होतील की नाही, याबाबत शेतकरी आज तरी अनभिज्ञ आहे.ही मुदत ३० सप्टेंबरला संपत असल्याने शेतकºयांनी रक्कम भरण्यासाठी हेलपाटे घालण्यास सुरुवात केली आहे. परंतु, कुटुंबातील किती व्यक्तींंना कर्जमाफीचा लाभ होईल, याची अधिकृत माहिती नसल्याने तो द्विधावस्थेत सापडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnewsबातम्या