शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

सुवर्णपदकासाठी पुणे विद्यापीठात शाकाहारीची अट!, विद्यार्थ्यांकडून परिपत्रकाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 06:20 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावाने देण्यात येणा-या सुवर्णपदकासाठी शाकाहारी असण्याची अट विद्यापीठाने घातल्यामुळे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावाने देण्यात येणाºया सुवर्णपदकासाठी शाकाहारी असण्याची अट विद्यापीठाने घातल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, खानपानाच्या विविधतेवरून भेदभाव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या परिपत्रकाची होळी केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून गेल्या काही वर्षांपासून शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यात येते. २०१६-१७ या वर्षीच्या सुवर्णपदकासाठी महाविद्यालये व विद्यापीठाच्या विभागांनी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे परिपत्रक शैक्षणिक प्रवेश विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. या परिपत्रकात सुवर्णपदकासाठी घालण्यात आलेल्या अटी भेदभाव करणाºया असल्याने त्याचा विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.दरम्यान, हे सुवर्णपदक २००६पासून देण्यात येते. त्याचे निकषही तेव्हापासून आहेत. शैक्षणिक गुणवत्ता, खेळाडू, निव्यर्सनी व शाकाहारी विद्यार्थ्यांस प्राधान्य दिले जाते. विद्यापीठ आहाराबाबत भेदभाव मानत नाही. देणगीदारांशी चर्चा करून आहाराच्या निकषांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.टिष्ट्वटरवरून आदित्य ठाकरेंनी पुणे विद्यापीठावर घेतला आक्षेपमुंबई : मुंबई विद्यापीठानंतर आता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पुणे विद्यापीठावर निशाणा साधला आहे. पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकावर आक्षेप घेत, विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे आणि करिअरकडे लक्ष द्यावे, खाण्याकडे नाही, असे टिष्ट्वटरच्या माध्यमातून त्यांनी सुनावले आहे.पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा असे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी काय खावे हे विद्यापीठाने ठरवू नये असे आदित्य यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी