शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

विवाह सोहळ्यात रूजतीये ‘पौराणिक थीम’ची संकल्पना; परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:02 PM

आपल्या संस्कृतीचे पावित्र्य जपण्याबरोबरच पारंपरिक विधींना कोणताही धक्का लागू न देता परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम असलेल्या ‘पौराणिक’ संदर्भांवर आधारित मालिकांचा अनोखा टच ‘थीम वेडिंग’ला दिला जात आहे.

ठळक मुद्देउंची सेटस किंवा भव्यदिव्यता म्हणजे ‘थीम’नव्हे : रमेश पाटणकर‘पौराणिक’ संदर्भांवर आधारित मालिकांचा अनोखा टच

नम्रता फडणीस

पुणे : ‘थीम वेडिंग’ म्हटले की डोळ्यासमोर येतात ते उंची सेट्स, भरजरी पेहराव आणि  नेत्रदिपकता... सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी यांच्या विवाहसोहळ्यात किंवा चित्रपटांमध्ये अशाप्रकारच्या ‘थीम वेडिंग’ ची संकल्पना राबविलेली आपण अनेकदा पाहिली आहे. मात्र आता मराठमोळ्या पारंपरिक लग्नसोहळ्यामध्येही  ही ‘थीम वेडिंग’ची संकल्पना रूजू लागली आहे. आपल्या संस्कृतीचे पावित्र्य जपण्याबरोबरच पारंपरिक विधींना कोणताही धक्का लागू न देता परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम असलेल्या ‘पौराणिक’ संदर्भांवर आधारित मालिकांचा अनोखा टच ‘थीम वेडिंग’ला दिला जात आहे. या संकल्पनेमधून आपल्या संस्कृतीमधील एक काव्यमय पान उलगडले जात आहे हे त्यातील वेगळेपण!कोणताही मराठी माणूस किंवा खरतर प्रत्येक भारतीय व्यक्ती हा उत्सवप्रियच असतो. प्राचीन संस्कृतीमध्ये इतके सौंदर्य आणि वैविध्य दडलेले आहे की त्यातून व्यक्तीला कलात्मक अनुभूती मिळते. त्यामुळेच आपल्या प्रत्येक पारंपरिक सोहळ्यांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कारण त्या सोहळ्यांमधील प्रत्येक विधी आणि संस्काराच्या मागे दडलेला अर्थ त्याला सर्वांगीण समृद्ध करत असतो. प्राचीन संस्कृती आणि संस्काराचे वैभव नव्या पिढीलाही उमगावे या उददेशानेच ‘पौराणिक थीम वेडिंग’ ची संकल्पना विवाहसोहळ्यांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न केला जातोय. येत्या ४ डिसेंबरला इस्कॉन मंदिरात होणा-या एका मराठमोळ्या कुटुंबाच्या लग्नसोहळ्यात ‘कृष्ण रूक्मिणी विवाह’ची पहिलीच  मालिका उलगडली जाणार  आहे. अभिनय, कला, संगीत, नृत्यक्षेत्रातील अनुभवी कलाकारांच्या सहयोगाने नवनिर्मित संहिता व संगीतनृत्याच्या आधारे पौराणिक संदर्भांसहित विधींचे सादरीकरण हे या सोहळ्याचे वैशिष्ट आहे. 

उंची सेटस किंवा भव्यदिव्यता म्हणजे ‘थीम’नव्हे. हे त्या गोष्टींचे एकेक भाग आहेत. पौराणिक कथा-मालिकांमध्ये ज्या पद्धतीने विवाहसोहळा झालेला आहे, तशाच पद्धतीची थीम घेऊन आम्ही आगळावेगळ्या सोहळ्याची मुहूर्तमेढ रूजवित आहोत. श्रीराम सीता स्वयंवर, पेशवाई विवाह या अभिजात मालिकेतील अशीच एक ‘कृष्णरूक्मिणी विवाह’ कथा आम्ही विवाहसोहळ्यात सादर करणार आहोत. या मालिकेतला हा पहिला विवाहसोहळा होत आहे. वधू आणि वर दोघेही ‘कृष्ण आणि रूख्मिणीच्या मेकअप आणि पेहरावात येणार आहेत. नृत्य, संगीत, नाट्यमयता अशा विविध कलाप्रकारांनी हा विवाह सोहळा नटणार आहे. या संकल्पनेचा कॉपीराईट मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत- रमेश पाटणकर, पाटणकर इव्हेंट्स 

टॅग्स :Puneपुणे