दुर्गम व दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, या उद्देशाने पुरंदर तालुक्याच्या दुर्गम भागातील कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील झिरीपवस्ती प्राथमिक शाळेला उद्योजक सुरेश उबाळे यांनी संगणक संच भेट दिला.
शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, ऑनलाईन शिक्षणाची गरज, डिजिटल शाळा व मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, या सर्व बाबींचा विचार करून शाळेमध्ये संगणक असणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळेला संगणक मिळावा, अशी मागणी शाळेतील मुख्याध्यापक संजय निगडे व शिक्षक प्रवीण निगडे यांनी केली होती. याची दखल घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विशाल भोसले यांनी प्रयत्न केले व उद्योजक सुरेश उबाळे यांच्याकडून शाळेला संगणक मिळवून दिले.
या वेळी कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, माजी सरपंच अशोक निगडे, माजी सरपंच लक्ष्मण वाघापुरे, माजी उपसरपंच बापूराव भोसले, दिलीप भोसले, पोपट निगडे, दीपक भोसले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विशाल भोसले उपस्थित होते.
२८ नीरा