शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ठेकेदारांसोबत पीएमपी आगारप्रमुखांचे साटेलोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 20:33 IST

ठेकेदारांकडून दररोज अधिकाधिक किलोमीटर अंतरापर्यंत बस धावण्यासाठी प्रयत्न केले जातात. जेवढे जास्त किलोमीटर तेवढे जास्त पैसे, हे यामागचे गणित आहे.

ठळक मुद्देलांब पल्ल्याच्या मार्गासाठी आर्थिक देवाणघेवाण, चालकांचा आरोपपीएमपीच्या मालकीच्या बसेसची संख्या अपुरी असल्याने ठेकेदारांमार्फत काही मार्गांवर बस संचलन सुमारे ६५३ बस ठेकेदारांच्या असून त्यापैकी ४५० च्या जवळपास बस मार्गावर चालकांना एक बस व एक मार्ग किमान तीन महिन्यांसाठी सध्या ठेकेदारांना प्रत्येक किलोमीटरसाठीसुमारे ५४ रुपये

पुणे : काही आगारामध्ये कर्मचाऱ्यांना आरामदायी कामे देण्यासाठी ‘रेट कार्ड’ असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. आता त्यामध्ये काही आगारप्रमुखांचे ठेकेदारांशी साटेलोटे असल्याच्या आरोपाची भर पडली आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या मालकीच्या बसला डावलून ठेकेदारांकडील बसला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप काही चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.पीएमपीच्या मालकीच्या बसेसची संख्या अपुरी असल्याने ठेकेदारांमार्फत काही मार्गांवर बस संचलन केले जाते. प्रामुख्याने बीआरटी मार्गावर ठेकेदारांकडील बस सोडल्या जातात. सुमारे ६५३ बस ठेकेदारांच्या असून त्यापैकी ४५० च्या जवळपास बस मार्गावर असतात. तर पीएमपीच्या ताफ्यातील एक हजार ते अकराशे बस धावतात. त्यातील सुमारे १५० बसचे दररोज ब्रेकडाऊन होते. त्यामुळे सध्या मार्गावर अधिकाधिक बस सोडण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. बसचे वेळापत्रक निश्चित असून त्यानुसार बससह चालक व वाहकांच्या कामाचे नियोजन केले जाते. आगारप्रमुख व टाईमकिपरवर त्याची जबाबदारी असते. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी बस संचलनामध्ये पीएमपीच्या मालकीच्या बसला पहिले प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू करण्यात आली होती. तसेच चालकांना एक बस व एक मार्ग किमान तीन महिन्यांसाठी दिला जातो, असे एका चालकाने सांगितले.एखाद्या लांबपल्याच्या मार्गावर पीएमपीच्या मालकीची बस असल्यास अचानक काही आगारप्रमुखांकडून या मार्गावर ठेकेदारांची बस सोडली जाते. सध्या ठेकेदारांना प्रत्येक किलोमीटरसाठीसुमारे ५४ रुपये दिले जातात. काही दिवसांपुर्वी हा दर सुमारे ५६ रुपये एवढा होता.दररोज बस जेवढी किलोमीटर धावेल, त्याप्रमाणे त्यांना पैसे दिले जातात. त्यामुळे ठेकेदारांकडून दररोज अधिकाधिक किलोमीटर अंतरापर्यंत बस धावण्यासाठी प्रयत्न केले जातात. जेवढे जास्त किलोमीटर तेवढे जास्त पैसे, हे यामागचे गणित आहे. त्यासाठी लांब पल्ल्याचे मार्ग फायदेशीर ठरतात. या मार्गांसाठी काही आगारप्रमुख व ठेकेदारांमध्ये आर्थिक समझोता होतो. काही आगारप्रमुखांकडून ठेकेदारांच्या बसला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप चालकांनी केला आहे. ----------- 

एका चालकाने दिलेल्या माहितीनुसार, ‘चालकांना संबंधित मार्गावर किमान तीन महिन्यांसाठी फिक्स ड्युटी दिली जाते. तक्रारी आल्यासच हा मार्ग बदलला जातो. पण काही संबंधित आगारप्रमुखाने कोणतेही कारण न देता मार्ग बदलला. हा मार्ग ठेकेदाराकडील बसला देण्यात आला. याबाबत विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारही केली आहे.’मार्गात बदल करण्यावरून चालक व आगारप्रमुखांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. असाच वाद झालेल्या एका चालकाने सांगितले की, आगारप्रमुखांनी अचानक मार्ग बदलल्याने त्यांच्याशी वादही झाला होता. हा वाद मारहाणीपर्यंत गेला असता. पण त्यांनी चुक मान्य केल्याने पुढील वाद टळला. अनेकदा ठेकेदारांच्या बसला लांब पल्याचे मार्ग दिले जातात. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होते.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल