शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रिंगरोड, पाणी, कचऱ्यासाठी भरीव तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:37 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या २ हजार ५९१ कोटी रुपयांच्या

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या २ हजार ५९१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास सोमवारी मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतविधान भवन येथे पार पडलेल्या बैठकीत ही मंजुरी मिळाली. त्यात हिंजवडी मेट्रो, रिंगरोड, पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, अग्निशमन सेवेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.पुणे व मुंबई शहरालगतच्या भागाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, या उद्देशाने पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री पीएमआरडीएचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०१८-१९ या वर्षासाठी एकूण रक्कम रुपये २ हजार ५९१ कोटी ७७ लाख इतक्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते उपस्थित होते.तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी अधिकारीही उपस्थित होते.अंदाजपत्रकात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी ८८८ कोटी, रिंगरोडसाठी १ हजार २३५ कोटी, म्हाळुंगे टाऊनशिपसाठी १५२ कोटी, रस्ते व पूल बांधणीसाठी ९९ कोटी, वाघोली पाणीपुरवठा२५ कोटी, अग्निशमन केंद्र्रासाठी ५० कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमआरडीएकार्यक्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.पीएमआरडीएच्या विकासकामांसाठी तरतूदरिंग रोड प्रकल्प : १२३५.३०हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो : ८८८म्हाळुंगे नगररचना योजना : १५२प्रादेशिक आराखड्यातीलरस्ते : १२४अग्निशमक केंद्र विकास : ५०पीएमआरडीए प्रशासकीयइमारत : ५०वाघोली पाणी पुरवठायोजना : २५विकास आराखड्यासाठी : २२कचरा व्यवस्थापनासाठी : १०पुणे-लोणावळा ‘सब-वे’ : ९पुरंदर विमानतळ रस्ता जोडणे : ७इंद्रायणी नदी सुधारणा योजना : ६इतर प्रकल्पासाठी : १२.९३(आकडे कोटींमध्ये)