शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एकाच दिवसात रस्त्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 03:24 IST

२० वर्षांपासून रखडलेल्या कामाचे भूमिपूजन; ५०० मीटर रस्ता एका दिवसात

कर्वेनगर : कर्वेनगर भागातील पिनाक कॉलनी येथील गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक राजेश बराटे, नगरसेवक सुशील मेंगडे, नगरसेविका वृषाली चौधरी, भाजपा पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकला मेंगडे, विठ्ठल बराटे, दत्तात्रय चौधरी यांच्यासह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापौर मुक्ता टिळक यांनी तिन्ही नगरसेवकांचे अभिनंदन करून पुणे शहराच्या विकासकामांची माहिती नागरिकांना सांगितली. या वेळी नगरसेवक सुशील मेंगडे म्हणाले, ‘‘पिनाक कॉलनीमध्ये रस्ता नसल्याने अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.’’या कॉलनीला जाणारा रस्ता हा खासगी मालकीचा असल्याने रस्ता विकसित होण्यात मोठी अडचण निर्माण होती. यासाठी आयुक्त व नगर अभियंता यांनी पाहणी करून व महापौरांच्या दालनात जागामालकांना योग्य मोबदला देण्यात येईल, हा निर्णय घेतल्यावर तातडीने हा रस्ता विकसित करण्याच्या कामाला खरी चालना मिळून या रस्त्याच्या डांबरीकरण कामास यश आले. यापुढील काळात आपल्या प्रभागाचा विकास करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.या प्रसंगी माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, राजेश बराटे व नगरसेविका वृषाली चौधरी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना खऱ्या अर्थाने दिवाळीची भेट मिळाली, असे जाहीरपणे सांगितले. हेमंत बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक शिवराम मेंगडे यांनी आभार मानले.रस्ता नव्हता, तर अनेक अपघात झाले होते. ज्येष्ठांची तर हाडे मोडली होती. रस्ता एकाच दिवसात झाल्यावर लगेचच पथदिवे चालू करण्यात आले आहेत; त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये या वर्षी खरोखरच दिवाळी आली आहे. - समा केळकर२० वर्षे सगळे नागरिक हतबल झाले होते. शंभर कुटुंबे असूनही रस्ता उपलब्ध होत नव्हता. रस्त्याबरोबर कचरा, लाईट, पाणी याने नागरिक त्रस्त झाले होते. ५०० लोक राहत असून रस्त्यामुळे घरी येण्यास मन तयार होत नव्हते. नगरसेवकांच्या प्रयत्नशील कामामुळे आम्ही समाधानी आहोत.- प्रकाश महाजन, ज्येष्ठ नागरिकज्येष्ठ, महिला आणि विद्यार्थी यांना घरी येताना-जाताना भयंकर त्रास होत होता. पावसाळ्यात तर २ फूट पाय गाडले जात होते. पाण्याची डबकी वाढली होती. किरकोळ अपघात नियमित होत होते. गाड्या रस्त्यावर लावाव्या लागत होत्या. सोनसाखळी चोरी वाढली होती. रस्त्यामुळे सर्व समस्या सुटल्या- जयंत विराळ, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकPuneपुणे