शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

तक्रारी आॅनलाइन; पण निपटारा नाही, महापालिकेचे गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:04 IST

पुणे : महापालिकेचे संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांक, पुणे कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप, ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर आदी माध्यमांद्वारे नागरिकांना घरी बसून आॅनलाइन तक्रारी नोंदविण्याची चांगली सुविधा उपलब्ध झाली

पुणे : महापालिकेचे संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांक, पुणे कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप, ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर आदी माध्यमांद्वारे नागरिकांना घरी बसून आॅनलाइन तक्रारी नोंदविण्याची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. पण किरकोळ समस्यांचा अपवाद वगळल्यास गंभीर तक्रारींची दखल महापालिका प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे.नागरिकांना तक्रारी घेऊन महापालिका तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये फेºया माराव्या लागू नयेत, यासाठी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या पुढाकारातून हायटेक यंत्रणा उभारण्यात आली. या आॅनलाइन यंत्रणेमार्फत तक्रारी नोंदवून त्याची सोडवणूक कशा प्रकारे होते याची पाहणी लोकमत टीमकडून करण्यात आली. त्याचबरोबर पालिकेकडे तक्रारी घेऊन येणाºया नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये आॅनलाइन सेवेमुळे प्रशासनाकडे तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी निश्चितच अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. मात्र किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारींवर आयुक्त तसेच वरिष्ठ कार्यवाही होत नसल्याने नागरीकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महापालिकेकडून सोनोग्राफी मशीन खरेदी, सीसीटीव्ही भाड्याने घेणे, शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव आदींच्या खरेदीमध्ये झालेले गैरव्यवहार, ई-लर्निंग योजना, अधिकाºयांकडून कामामध्ये झालेला हलगर्जीपणा याबाबत सजग नागरिक मंच तसेच इतर स्वयंसेवी संस्थांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या, मात्र या तक्रारींवर आयुक्तांकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेची प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट करणाºया गैरव्यवहारांबाबतच्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाºयांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याच्या प्रतिक्रिया तक्रारदारांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडे कचरा साठला आहे, पाण्याची पाइपलाइन लिकेज होते आहे, गतिरोधक उखडला गेला आहे, रस्त्यात खड्डे पडले, अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे आदी स्वरुपाच्या आॅनलाइन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. काही तक्रारींची लगेच दखल घेण्यात आली. त्यापैकी कचरा साठला आहे, खड्डे पडले आहेत आदी किरकोळ स्वरुपाच्या तक्रारींची सोडवणूक केली. एसएनडीटी चौकात पाणी साचून वाहतुकीला त्रास होत असल्याची तक्रार न सोडविताच बंद करण्यात आली. हडपसर ते स्वारगेट मार्गावर खड्डे पडल्याच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. काही अधिकाºयांनी तक्रारींचे निराकरण न करताच ती तक्रार सोडविली गेली, असा संदेश दिला आहे. तक्रार सुटली नसताना ती सोडविण्यात आल्याचे सांगितले़>नकारात्मक अभिप्राय देण्याची सुविधाच नाहीमहापालिकेने तक्रारींचे निवारण योग्य प्रकारे होते आहे ना, याची तपासणी करण्याचे काम एका त्रयस्थ कंपनीला दिले आहे. नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारींची सोडवणूक झाली का, याची विचारणा करणारे फोन कॉल्स या कंपनीच्या प्रतिनिधींकडून तक्रारदारांना केले जातात.महापालिकेच्या आर्थिक गैरव्यवहारांविषयी आयुक्तांना पाठविलेले निवेदन, तक्रारी आदींची सोडवणूक झाली का, याची विचारणा त्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून केली जाते, असे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.मात्र आयुक्तांकडून या तक्रारींवर काहीच कारवाई केली जात नसल्याने निगेटिव्ह रेटिंग देण्याची सुविधा आहे का, प्रतिनिधीला विचारल्यानंतर तशी सुविधा नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती वेलणकर यांनी दिली.>आकड्यांचा खेळमहापालिकेकडे आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी ३६ हजार १३५ जणांनी नोंदणी केली आहे. त्यांच्याकडून ६४ हजार ४९५ तक्रारी नोंदविण्यात आल्या, त्यापैकी ६३ हजार ९९३ तक्रारींची सोडवणूक केली असल्याची आकडेवारी संकेतस्थळावर दर्शविण्यात येत आहे.प्रत्यक्षात सोडवणूक न झालेल्या तक्रारींची संख्या खूपच मोठी आहे. मात्र अनेक तक्रारी न सोडविताच बंद करून त्या सोडविल्या असल्याचे दर्शविण्यात येत आहे.>आयुक्तांना पडला विसरस्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेसाठी पुणे महापालिकेकडून प्रस्ताव तयार केला जात असताना आयुक्त कुणाल कुमार यांनी आॅनलाइन तसेच तक्रार सोडवणुकीकडे विशेष लक्ष घातले होते. अधिकाºयांकडून तक्रारींचे निराकरण होते ना, याचा दररोज अहवाल घेतला जात होता. मात्र स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेमध्ये महापालिकेची निवड झाल्यानंतर आता या आॅनलाइन तक्रारींचा आयुक्तांना विसर पडला असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आॅनलाइन तक्रार करणाºया नागरिकांना त्यांची तक्रार सोडविण्यात आल्याचे पूर्वी मेसेज पाठवून कळविले जात होते. त्यामुळे तक्रार न सोडविताच ती बंद करण्यात आल्याचे नागरिकांना समजत होते. मात्र त्यामुळे हा तक्रार सोडविल्याचा मेसेज पाठविणेच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या तक्रारीचे पुढे काय झाले ते समजत नाही.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका