शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पुणे पोलिसांचा डीएसकेंच्या घर-कार्यालयावर छापा, ठेवीदारांच्या प्रचंड तक्रारींनंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:54 IST

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे.

पुणे - ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे. बुधवारी तब्बल २५८ जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. दरम्यान, डी.एस. कुलकर्णी यांच्या विरुद्ध आलेल्या प्रचंड तक्रारीनंतर गुरुवारी सकाळपासून पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने डी.एस.के यांच्या पुणे शहरातील 4 व मुंबईतील एका ठिकाणावर छापा मारला आहे. या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मात्र यावेळी  डी. एस. कुलकर्णी घरी नसल्याचे सांगण्यात येत आहे.  ठेवीदारांच्या ज्या तक्रारी आल्या आहेत,  त्यादृष्टीने कागदपत्रे व पुरावा हस्तगत करण्यासाठी हे शोधमोहीम सुरू करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

काय आहे नेमके प्रकरण?

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी.एस.कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे. बुधवारी तब्बल २५८ जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. आतापर्यंत पोलिसंकडे आलेल्या तक्रारीतील रकमेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून ती किमान १० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे़ ठेवीदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून त्यात एसआयटी स्थापन करून डीएसके यांच्या सर्व कंपन्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या एक महिन्याभरापासून डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात सर्वप्रथम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीच्या तक्रारी देण्यास सुरुवात केली होती. या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्या. आर्थिक गुन्हे शाखेने या अर्जदारांचे जबाब नोंदविल्यानंतर २८ आॅक्टोबर रोजी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला आहे. मंगळवारपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे एकूण ४४ तक्रारी आल्या होत्या. त्यात फसवणूक झालेली रक्कम ४ कोटी ७८ लाख रुपये इतकी होती़ आर्थिक गुन्हे शाखेच्या संगम पुलाजवळील कार्यालयात डी. एस.के. उद्योगसमुहाविरोधात तक्रार देणा-या ठेवीदारांची बुधवारी सकाळपासून गर्दी झाली होती. अहमदनगर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई अशा विविध शहरांतून ठेवीदार आले होते़ त्यातील बहुसंख्य हे ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी होते़ त्यांनी आपल्याला मिळालेले फंड व अन्य पैसे डीएसके उद्योगसमुहात गुंतविले आहेत. त्यातील बहुसंख्य लोकांना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मुद्दल अथवा व्याजही मिळालेले नव्हते. अहमदनगरहून आलेल्या एका दाम्पत्याने सांगितले, की आम्ही आमची सर्व पुंजी ४० लाख रुपये २००४ मध्ये गुंतविली आहे़ त्याचे व्याज गेल्या २ वर्षांपर्यंत मिळत होते़ पण, त्यानंतर मिळणे बंद झाले.

पुण्यातील एक आजीही येथे आल्या होत्या. त्यांनी सांगितले, की मी ७ लाख रुपये गुंतविले आहेत. त्यावरील व्याज हेच म्हातारपणातला आधार होता़ पण आता व्याजही मिळणे बंद झाले़ मुद्दल मिळाली तरी खूप झाले असे आता वाटते. या प्रकरणी काही गुंतवणुकदारांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की डी. एस. कुलकर्णी यांनी घरकुल लॉन्समध्ये बोलविलेल्या बैठकीत आम्हाला त्यांच्या विविध कंपन्यांमधील मुदत ठेवींची माहिती दिली़ त्यावरून आम्ही मुदत ठेवी ठेवल्या. आता ठेवींची मुदत संपण्याच्या वेळी आम्हाला माहिती देण्यात आली, की त्यांना मुद्दलाची रक्कम आणि त्यावरील व्याज परत देणे शक्य नाही़ त्यामुळे आम्हाला पुढील तारीख घातलेले धनादेश स्वीकारणे भाग पडले. अनेकांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले, की डी. एस. कुलकर्णी व इतरांनी आम्हा गुंतवणुकदारांच्या समोर असे चित्र उभे केले की, त्यांना मुदत ठेवी स्वीकारण्याचा अधिकार आहे. त्यांना अधिकार नसतानाही त्यांनी आम्हाला आमिष दाखवले आणि हजारो गुंतवणुकदारांकडून प्रचंड प्रमाणात मुदत ठेव रक्कमा गोळा केल्या आणि आम्हाला फसवले आहे़ स्वतंत्र एसआयटी स्थापन करून डीएसके कुटुंबाची व त्यांच्या सर्व कंपन्यांची आणि संचालकांची योग्य ती चौकशी करण्यात यावी़ आम्ही सर्व गुंतवणूकदार हे मध्यमवर्गीय असून ९० टक्के हे ज्येष्ठ नागरिक आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, असे त्यात म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणे