शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाची बदली केल्यास उपोषण, ग्रामपंचायतीची ग्रामसेवकांच्या कारभारविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 04:48 IST

सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे करण्यास सहकार्य करणारे, १४व्या वित्त आयोगाचा आराखडा तसेच सांसद योजनांचा आराखडा तयार करणारे ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचून तक्रारी केल्या जात आहेत.

नीरा - सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे करण्यास सहकार्य करणारे, १४व्या वित्त आयोगाचा आराखडा तसेच सांसद योजनांचा आराखडा तयार करणारे ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचून तक्रारी केल्या जात आहेत.वास्तविक ग्रामसेवक हुशार, कार्यतत्पर तसेच प्रामाणिक कर्मचारी आहे. विविध कार्यालयांकडे त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या जात आहेत. त्यांच्या बदलीचा घाट घातला जात आहे. हा केवळ राजकीय विषय नसून तो सरकारी कर्मचाºयांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. लहान-सहान तक्रारींवर प्रशासन बदलीची कारवाई करत असल्यास हे गैर आहे. ग्रामसेवकांची नियमांचे उल्लंघन करत बदली केल्यास बुधवारपासून (दि.१४) पुरंदरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे निवेदन ग्रामपंचायत सदस्या आशा निगडे व इतर ग्रामस्थांनी पुरंदरच्या गटविकास अधिका-यांना दिले आहे.गुळुंचे ग्रामपंचायतीत नुकतेच सत्तांतर झाले असून, यापूर्वीचे सत्ताधारींचे पॅनल पराभूत झाले आहे. सत्तेवर आल्यावर मागील पाच वर्षांच्या हिशेबाची मागणी नवीन सरपंच संभाजी कुंभार तसेच सदस्यांनी केली होती. परंतु ग्रामसेवक वेळेवर हजर नसतात, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करतात तसेच पाच वर्षांतील आर्थिक रेकॉर्डमध्ये अनियमितता असल्याची शक्यता व्यक्त करत ग्रामसेवकांच्या कारभाराविरोधात सरपंच संभाजी कुंभार व सदस्यांनी गटविकास अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार केली होती. म्हस्के यांच्याऐवजी हुशार ग्रामसेवक देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर म्हस्के यांची बदली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची जोरदार चर्चा दोन दिवसांपासून गावात सुरु होती. काही लोकप्रतिनिधींनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता.तक्रारींमुळे त्यांची बदली करणे अयोग्यया चर्चेच्या अनुषंगाने गावातील सदस्य व ग्रामस्थांनी म्हस्के यांच्या बदलीला विरोध केला आहे. म्हस्के यांच्या कारभारात अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर जरूर कडक कारवाई करण्यात यावी, परंतु केवळ तक्रारीमुळे त्यांची बदली करणे अयोग्य आहे.२६ तारखेला तहकूब झालेल्या ग्रामसभेनंतर जी ग्रामसभा झाली त्यात अनेक बेकायदा विषय घेण्यात आले. या सभेच्या कार्यवाहीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी निगडे यांनी केली आहे.सध्याचे ग्रामसेवक आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीत. असलेल्या योजना त्यासंबंधित शासनाकडून आलेले निधी याबद्दल विचारणा केली असता माहिती देत नाहीत. मागील पंचवार्षिकमध्ये झालेल्या खर्चाचा हिशेब देण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. कार्यालयात नियमित हजर नसतात. लोकांची कामे अडून राहतात. त्यामुळे आम्ही दुसरा ग्रामसेवक मिळावा अशी मागणी गटविकास अधिकाºयांकडे केली होती.- संभाजी कुंभार, सरपंच, गुळूंचे

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायत