शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’साठी शुल्काची मागणी? करा नोडल अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 18:24 IST

काही आधार केंद्रांवर नोंदणी आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. नागरिकांना आता आधार समन्वयक अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याबरोबरच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

ठळक मुद्देगेल्या दोन महिन्यांत ३३ आधार यंत्रचालकांना टाकण्यात आले काळ्या यादीतजादा शुल्क आकारल्यास संबंधित सेवा केंद्र सील करून दाखल करण्यात येणार गुन्हे

कोरेगाव मूळ : गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील आधार केंद्र ठप्प झाली आहेत. त्याचा गैरफायदा घेत काही आधार केंद्रांवर सामान्य नागरिकांकडून आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. अशा प्रकारच्या विरोधात नागरिकांना आता आधार समन्वयक अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याबरोबरच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.केंद्र शासनाच्या आदेशानुसार बँकखाते, शाळा व महाविद्यालयात, प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी, मोबाइलच्या सीमकार्डला जोडणी करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्ह्यात आधार केंद्रांवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेत गेल्या दोन महिन्यांत ३३ आधार यंत्रचालकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांकडून आधारची कामे करताना अतिरिक्त शुल्क आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.नव्याने आधार नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तर, दुरुस्तीकरिता शासनाच्या नियमानुसार २५ रुपये शुल्क आकारले जाते. या व्यतिरिक्त नागरिकांकडून जादा शुल्क आकारल्यास आधार नोडल अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी. या ठिकाणी तक्रार केल्यानंतर निवारण न झाल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केवळ तक्रार स्वीकारण्याचे अधिकार आहेत. परंतु, आलेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठवून तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे.केंद्र चालकांना निलंबनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. आधारच्या दुरुस्तीसाठी नियमाप्रमाणे असलेल्या शुल्कापेक्षा जादा शुल्क आकारल्यास संबंधित सेवा केंद्र सील करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. आधार कार्डबाबत काढण्यात आलेल्या निविदा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी रद्द केल्या असून, प्रत्येक तालुक्यात एकच सरकारी केंद्र ठेवले आहे. तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे थेट अधिकार दिले असून तक्रारी आल्यास संबंधित सेवा केंद्रांवर ते कारवाई करू शकतात, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया- यूआयडीएआय) तक्रार निवारणासाठी १९४७ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPuneपुणे