शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मृत्यू झालेल्या इंजिनिअरच्या कुटुंबियांना ५१ लाखांची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 14:13 IST

वेलमेड कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर असलेले मयत सुनील पद्माकर घाडगे दैनंदिन कामकाज संपवून दुचाकीवरून मोशी येथे घरी चालले होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

ठळक मुद्देमहालोकअदालतमध्ये तडजोडीअंती दावा निकाली

पुणे : अपघाती मृत्यू झालेल्या मेकॅनिकल इंजिनिअरच्या कुटुंबियांना ५१ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये सत्र न्यायाधीश जे.डी.वडणे, अ‍ॅड. शशिकांत बागमार आणि अ‍ॅड. संतोष काशिद यांच्या पॅनेलने नुकसान भरपाईसाठीबाबतचा हा दावा निकाली काढला.     सुनील पद्माकर घाडगे (वय २७) असे अपघातात मृत्यू झालेल्या इंजिनिअरचे नाव आहे. ते वेलमेड कंपनीत कामाला होते. २४ एप्रिल २०१६ रोजी दैनंदिन काम संपवून ते दुचाकीवरून घरी म्हणजे मोशी येथे चालले होते. त्यावेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्या अपघातात घाडगे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी व आई-वडिलांनी डंपर मालक आणि डंपरची विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात अ‍ॅड. सुनीता नवले यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. घाडगे यांचे मृत्यूसमयी २७ वय होते. त्यांना दरमहा २५ हजार रुपये पगार होता, या गोष्टींचा विचार करून ६५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा दावा अ‍ॅड. नवले यांनी जून २०१६ मध्ये येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल केला होता. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये ५१ लाख रुपये देत हा दावा निकाली काढण्यात आला. अर्जदाराच्या वकील अ‍ॅड. सुनीता नवले, आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या वतीने अ‍ॅड. हृषीकेश गानू आणि लिगल आॅफिसर संकल्प प्रभाकर यांनी निकालासाठी महत्वाची भूमिका निभावली. 

टॅग्स :PuneपुणेmoshiमोशीCourtन्यायालय