शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘बालगंधर्व’ पूनर्विकासासाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 03:14 IST

प्रस्तावांचे सादरीकरण; कला क्षेत्रातील मान्यवरांची पुनर्विकास समितीमध्ये वर्णी

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास समिती स्थापन केली जावी आणि त्यामध्ये कला क्षेत्रातील व्यक्तींचा प्रामुख्याने समावेश असावा या रंगधर्मींच्या मागणीला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.पुनर्विकासासंबंधी निर्णय घेण्यासाठी वीस जणांची स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये सांस्कृतिक व कला विश्वातील तब्बल आठ मान्यवरांची वर्णी लावण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात आलेल्या प्रस्तावांची त्यांच्या उपस्थितीत पडताळणी होणार आहे. येत्या काही दिवसातच समितीच्या बैठकीमध्ये प्रस्तावांचे सादरीकरण करून अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूचा पुनर्विकास करण्याची घोषणा महापालिकेने करताच ही वास्तू पाडली जाणार? या चर्चेने सांस्कृतिक विश्वात खळबळ उडाली होती. मात्र महापालिकेने या वास्तूचा पुनर्विकास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल आणि त्यानंतरच पुर्नविकासाच्या दिशेने पावले उचलली जातील असे स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने समिती स्थापन केली असून, त्यात उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती अध्यक्ष, माजी स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, वास्तुशिल्पकार (भवन), आर्किटेक्ट यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्यकर्मी श्रीरंग गोडबोले, बालगंधर्व परिवाराच्या अनुराधा राजहंस, दिग्दर्शक प्रविण तरडे, निवेदक सुधीर गाडगीळ, आशय फिल्म क्लबचे विरेंद्र चित्राव या आठ जणांचा समावेश करण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज रंगमंदिर, मनोरंजनाच्या सुविधा, वाहनांसाठी मुबलक जागा अशा माध्यमातून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा विचार करण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या अंदाजपत्रकात ११ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी वास्तूविशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार 57 वास्तू विशारदांची नोंदणी महापालिकेच्या भवन रचना विभागाकडे झाली होती. त्यातील केवळ २६ वास्तू विशारदांकडून प्रस्ताव सादर झाले आहेत. त्या प्रस्तावांचे या समितीसमोर सादरीकरण होणार आहे.वास्तू विशारदांकडून मागविले दोन स्वरूपाचे प्रस्तावबालगंधर्व रंगमंदिराची सध्याची इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने प्रचलित डी.सी रूलनुसार नाट्यगृहाचा समावेश असणारी नवीन इमारत उभारणे आणि सध्याची इमारत कायम ठेवून नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे आणि उर्वरित क्षेत्रावर नव्याने सर्वार्थाने परिपूर्ण अशा पद्धतीचा रंगमंदिराचा प्रकल्प उभारण्यासाठी आराखडा करणे अशा दोन स्वरूपाचे प्रस्ताव मागविण्यात आले होते.बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे आणि त्यात बालगंधर्व परिवारातील व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे याचा आनंद आहे. पुनर्विकासाला विरोध नाही पण कशा पद्धतीने पावले उचलली जाणार आहेत हे महत्वपूर्ण आहे- अनुराधा राजहंस,बालगंधर्वांची नातसून

टॅग्स :Bal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर