शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त, जिल्हाधिकारी आज स्वीकारणार पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 03:29 IST

पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम मंगळवारी सकाळी आपल्या पदांचा पदभार स्वीकारणार आहेत.

पुणे : पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम मंगळवारी सकाळी आपल्या पदांचा पदभार स्वीकारणार आहेत.कुणाल कुमार यांची केंद्रात बदली झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून महापालिका आयुक्तपद रिक्त होते. राव यांचीच नियुक्ती होणार याची सुरुवातीपासूनचचर्चा होती. अखेर सोमवारी(दि. १६) शासनाने राव यांच्यासह २८ आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढले.पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या बदलीनंतर पालिका आयुक्तपद रिक्त झाले होते. त्याचप्रमाणे सौरभ राव यांनी जिल्हाधिकारीपदाचा चार वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला होता. त्यामुळे पालिका आयुक्तपदी कोण येणार आणि जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली पालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यामुळे राव यांना पुणे शहराच्या प्रश्नांची माहिती आहे. राव यांनी पुणे जिल्ह्यात आपल्या कामाचा प्रभाव पाडला. मतदारयाद्या दुरुस्ती, जलयुक्त शिवार योजनेत राज्यात सर्वाधिक चांगले काम, माळीण पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल, बोपखेलचा प्रश्न, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय राव यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनेहातळले आहेत. पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून राव यांच्यासमोर प्रामुख्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न, पार्किंग धोरणाची अंमलबजावणी, २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना असो, की नदी सुधार प्रकल्प, शहराचे पथारी धोरण आदी अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये ठाम भूमिका घेऊन हे सर्व प्रकल्प, योजना सर्व राजकीय पक्षांना बरोबर घेऊन पुढे घेऊन जावे लागतील.सार्वजिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार- शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीबरोबरच मेट्रोचेही काम संयुक्तरीत्या केले जाईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होत नाही, तोपर्यंत शहराचा लिव्हेबिलिटी इंडेक्स वाढणार नाही.- शहराची जमिनीखालील सांडपाण्याची वाहिनी जुनी झाली आहे, त्यामुळे हादेखील मोठा महत्त्वाचा विषय आहे. त्याचप्रमाणे नदी सुधार प्रकल्पही आव्हानात्मक आहे. समाविष्ट झालेल्या गावांत आधारभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे राव यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे