शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कातरवेळी उमटले सूरलहरींचे तरंग; नूपुरनाद महोत्सवाचा पुण्यात बहारदार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:26 IST

काश्मीर खोऱ्यातील संतूर या तंतुवाद्यावर लीलया फिरणाऱ्या जादुई बोटांनी सूरसाज चढवित एका वेगळ्याच भावविश्वाची अनुभूती रसिकांना दिली.

ठळक मुद्देरसिकमनावर उमटले संतूरच्या छेडलेल्या मंजूळ तारांमधून उमटलेल्या सूरलहरींचे तरंगपं. राहुल शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडत विविध राग आणि गीते वाजवत मिळवली श्रोत्यांची वाहवा

पुणे : काश्मीर खोऱ्यातील संतूर या तंतुवाद्यावर लीलया फिरणाऱ्या जादुई बोटांनी सूरसाज चढवित एका वेगळ्याच भावविश्वाची अनुभूती रसिकांना दिली. संतूरच्या छेडलेल्या मंजूळ तारांमधून उमटलेल्या सूरलहरींचे तरंग रसिकमनावर उमटले. आणि  रविवारी सायंकाळी ‘नूपुरनाद’ला चार चाँद लागले. प्रसंगी भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दैठणकर, कार्यवाह डॉ. स्वाती दैठणकर, नूपुर दैठणकर, निनाद दैठणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.निमित्त होते... भैरवी संगीत प्रसारक मंडळ आयोजित आणि कॉटनकिंग प्रस्तुत दोनदिवसीय नूपुरनाद महोत्सवाचे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पंडित राहुल शर्मा यांचे संतूरवादन व पंडित व्यंकटेशकुमार यांच्या स्वरमैफलीने नूपुरनाद महोत्सवाची सांगता झाली. कोथरूड येथील आयडियल कॉलनीच्या मैदानावर भरलेल्या या महोत्सवात रसिकश्रोत्यांना अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. पंंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र पंडित राहुल शर्मा मंचावर येताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. पंडित शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडत विविध राग आणि गीते वाजवत श्रोत्यांची वाहवा मिळवली. मध्य लय, द्रुत लय तीनताल... अन् कौशी ध्वनीमधील धून सादर होताना पंडित राहुल शर्मा यांना श्रोत्यांची मिळालेली दाद अवर्णनीय होती. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर साथ केली. दुसऱ्या सत्रात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या सुमधुर गायनाने शांतिरसाची अनुभूती आली. व्यंकटेशकुमार यांनी सादर केलेल्या कल्याण, बिहाग रागात विलंबित  अशा अवीट बंदिशींनी अभिजात शास्त्रीय संगीताचा एक एक बंध उलगडत नेत ही मंतरलेली सायंकाळ अवर्णनीय पर्वणी केली. त्यांनी सादर केलेल्या बंदिशींनी आसमंत दुमदुमला. ‘सजनी...,’ ‘मुख मोर मोर...’ या सादरीकरणावर श्रोत्यांनाही ठेका धरायला लावला. आजा सावरिया... ही भैरवी सादर करीत त्यांनी महोत्सवाची सांगता केली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, तानपुऱ्यावर शिवराज पाटील व निवृत्ती धाबेकर व हार्मोनियमवर राहुल गोळे यांची साथ लाभली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले. शास्त्रीय संगीत आणि नृत्य यासाठी हा महोत्सव समर्पित केलेला आहे. उत्कृष्ट कलाकारांचे सादरीकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गायन, नृत्य आणि वादन यामुळे यंदाचा महोत्सव विशेष असून, यातून अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्शन घडत आहे, असे डॉ. स्वाती दैठणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे