शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

पोलीस स्मृती दिनानिमित्त शोक कवायत; महिला तुकडीने वाहिली शहीद पोलिसांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 15:58 IST

कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या देशभरातील ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस स्मृति दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली़. कवायतीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील एका महिला तुकडीने सहभाग घेतला.

ठळक मुद्देदेशभरातील ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस स्मृति दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली़.शोक कवायतीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील एका महिला तुकडीने सहभाग घेतला.

पुणे : आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या देशभरातील ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस स्मृति दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली़ पाषाण येथील महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्रात आयोजित केलेल्या शोक कवायतीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील एका महिला तुकडीने सहभाग घेतला होता़ लडाख येथे २१ आॅक्टोंबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शूर शिपायांच्या तुकडीवर पूर्व तयारीनिशी अचानक हल्ला केला़ त्यावेळी त्या १० शूर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले़ तेव्हापासून २१ आॅक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो़ पोलीस स्मृतिदिनाचे दिवशी एकाचवेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले, त्या सर्वांना आदरांजी वाहण्यात येते़ महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी गुप्तचर विभागाचे सेवानिवृत्त संचालक विद्याधर वैद्य यांनी तसेच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक संजयकुमार, कारागृह महानिरीक्षक भुषणकुमार उपाध्याय, बिनतारी संदेश विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेशकुमार, संजीवकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम इत्यादी वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले़ या शोक कवायतीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन तुकड्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या २ तुकड्या, लोहमार्ग व पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या २ तुकड्या अशा ६ तुकड्यांनी व वाद्यवृंद्यानी सहभाग घेतला़ परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे व राखीव पोलीस उपनिरीक्षक महेश साळवी यांनी कवायतीचे नेतृत्व केले़.

वीरगती प्राप्त झालेल्या महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल सुरेश तेलामी यांच्यासह ३७९ जवानांच्या यादीचे वाचन सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, सतीश पाटील यांनी केले़ कार्यक्रमाला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ए़ डी़ जोग, अशोक धिवरे, ग्यानचंद वर्मा, सुरेश खोपडे तसेच पोलीस अधीक्षक सुवेझ हक, सह आयुक्त साहेबराव पाटील, अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, रवींद्र सेनगांवकर, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सुधीर हिरेमठ, अशोक मोराळे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस फौजदार सिताराम नरके यांनी केले़

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे