शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

पुढच्या वर्षी लवकर या...! पुण्यात पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 21:37 IST

सोन्याच्या पावलांनी वाजतगाजत घरोघरी विराजमान झालेल्या गौरीचेंही विसर्जन करण्यात आले

ठळक मुद्देनागरिकांनी महापालिकेने साकारलेल्या फिरत्या हौदांमध्ये गणेश मूर्तींचे केले विसर्जनकाहींनी मूर्ती दान करण्याचा मार्ग अवलंबलागौरी गणपतीला निरोप देताना भक्तगण झाले होते भावूक

पुणे : ’गणपती बाप्पा मोरया; पुढच्या वर्षी लवकर या' च्या जल्लोषात पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. ’सोन्याच्या पावलांनी’ वाजतगाजत घरोघरी विराजमान झालेल्या गौरीचेंही विसर्जन करण्यात आले. भाविकांनी उत्साहाच्या भरात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी नदीकाठचा रस्ता बंद करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे घरच्या घरी बादलीमध्ये तसेच महापालिकेकडून करण्यात आलेल्या फिरत्या हौदामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करून नागरिकांनी नियमांचे पालन केले तर काहींनी मूर्तीदान करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना ’जगाला करोनाच्या संकटातून मुक्त करून पुढच्या वर्षी लवकर या, अशी प्रार्थना भाविकांनी केली.

’श्रीं’चे घरोघरी आगमन झाल्यावर चौथ्या दिवशी गौरी विराजमान होतात आणि पाचव्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडतो. यंदाच्या वर्षी नऊ दिवसांचा गणेशोत्सव असल्यामुळे गौराईंचे तिस-या दिवशीच घरात आगमन झाले.  सोमवार हा दिवस पूजेचा असल्याने परंपरेनुसार सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या टप्प्यात गौरी गणपतीची पूजा करून महानैवेद्य दाखविण्यात आला. घरांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये दोन्ही दिवस हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडले. आरती, नैवेद्य आणि दोरे घेऊन गौरींचा सण मंगळवारी पार पडला.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेश मूर्तीचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्यावर बंधने आल्यामुळे नागरिकांनी घरामध्येच बादलीत विसर्जन करावे, असे आवाहन सरकार आणि महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार अनेकांनी घरामध्येच बादलीत गणेश मूर्तीचे विसर्जन केले. काही नागरिकांनी महापालिकेने साकारलेल्या फिरत्या हौदांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले. काहींनी मूर्ती दान देण्याचा मार्ग अवलंबला. काहींनी घरीच गणेश मूर्ती तयार करताना, त्यात काही बियांचे रोपण केले होते. घरातील कुंडीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करून अनेकांनी अंकुर गणेशाच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमाचे उदाहरण समोर ठेवले. गौरी गणपतीला निरोप देताना भाविक भावूक झाले होते.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका