शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

उलगडले ग्रामीण जीवनाचे रंग; ‘व्हिलेज लाईफ’ प्रदर्शनाचे दिनकर थोपटे यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 12:53 IST

चित्रांमुळे ग्रामीण जीवनाचे विविध रंग उलगडले. निमित्त होते चित्रकार दत्तात्रेय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ चित्रप्रदर्शनाचे.

ठळक मुद्देबालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात करण्यात आले प्रदर्शनाचे आयोजनप्रदर्शनात चित्रांमध्ये पाहायला मिळते लहान मुले, प्राणी आणि ग्रामीण जीवनातील क्षण, सौंदर्य

पुणे : चित्रप्रदर्शनाद्वारे ग्रामीण जीवनाचे दर्शन आज पुणेकरांना घडले. ग्रीष्म ऋतूत लालबुंद फुलांनी बहरलेला गुलमोहोर... वसंत ऋतूमध्ये विविध रंगांनी नटलेला निसर्ग... कौलारू घराच्या अंगणात बागडणाऱ्या कोंबड्या... सोनेरी रंगाची उधळण करणारी खेड्यातील रम्य सायंकाळ या चित्रांमुळे ग्रामीण जीवनाचे विविध रंग उलगडले. निमित्त होते चित्रकार दत्तात्रेय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ चित्रप्रदर्शनाचे.या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक नंदकुमार सागर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त राजकुमार लोढा आदी उपस्थित होते.  थोपटे म्हणाले, ‘‘प्रदर्शनात चित्रांमध्ये लहान मुले, प्राणी आणि ग्रामीण जीवनातील विविध क्षण, सौंदर्य पाहायला मिळते. खेड्यातील निसर्ग, तेथील माणसे, प्राणी, खेड्यातील घरे असे ग्रामीण जीवनातील विविध पैलू चित्रांच्या माध्यमातून दिसले. असे चित्र काढणे अवघड आहे. खेड्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये कला दडलेली असते; परंतु ती पुढे आणण्यासाठी त्यांना कोणताही पाठिंबा मिळत नाही. कलाकार कलानिर्मितीबरोबर राष्ट्रनिर्मितीचे कामदेखील करीत असतो.’’साबळे म्हणाले, ‘‘आपल्यामध्ये कोणतीही कला असो तीमध्ये सातत्य टिकवणे गरजेचे आहे. कलावंत हा संवेदनशीलतेने काम करीत असतो. हे खूप महत्त्वाचे आहे. आपली कला जोपासणे हे काम आहे.’’   गायकवाड म्हणाले, ‘‘मी एक कलाकार आहे. जीवनात एक तरी कला अवगत असली पाहिजे. एक छंद म्हणून कला जोपासली पाहिजे.’’

प्रदर्शनात ७५ चित्रांचा समावेश असून खेड्यातील घरे, डोंगर, गाई, मेंढ्या, बकरी, झोपड्या, धनगरांची पाले अशा प्रकारची चित्रे रेखाटली आहेत. याच विषयावर आधारित जेजुरी, सासवड, ओतूर, जुन्नर या परिसरातील चित्रे प्रदर्शनात पाहायला मिळतात. खेड्यातील निसर्ग, माळराने अशी ग्रामीण जीवनशैली आपल्या कलेद्वारे कागदावर उमटवली आहेत.- दत्तात्रेय शिंदे

टॅग्स :Bal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरPuneपुणे