शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

बहारदार गायनाने रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 00:23 IST

डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनद्वारा आयोजित संगीत महोत्सव प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे सुरू झाला. बहारदार गायन सादर झाले.

चिंचवड : डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनद्वारा आयोजित संगीत महोत्सव प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे सुरू झाला. बहारदार गायन सादर झाले.डॉ. वसंतरावांचे सुपुत्र बापू देशपांडे व फाउंडेशनचे विश्वस्त प्रभाकर लेले, अनंत दामले, अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी डॉ. वसंतरावांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.अंकिता जोशी यांनी गायन केले. सभेची सुरुवात राग भीमपलासीमधील ‘तन दीनो मन दीनो’ या बडा ख्यालाने झाली. जोड बंदीश ‘जा जारे अपने मंदीरवा’ यानंतर त्यांनी ‘राहिले ओठांतल्या ओठात’ हे डॉ. वसंतरावांचे गीत सादर करीत गायन समाप्ती केली. त्यांना साथसंगत संवादिनी अभिनव खंदे, तबला - प्रसाद करंबळेकर, तानपुरा- राजश्री देवळे व गीतांजली हराळ-पाटील अशी होती. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, विजय वसंतराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले.गोव्याचे डॉ.शशांक मक्तेदार यांचे गायन झाले. त्यांनी राग कामोदमधील विलंबित झुमरा तालातील ‘मनी मालनीयाँ’ बंदीश, त्यानंतर ‘कारे जाने ना दुंगी’ हा छोटा ख्याल, राग बहारदारमधील ‘सुधे सुगंध’ ही बंदीश सादर करून गायनसमाप्ती केली. त्यांना तबला साथ विघ्नहरी देव, संवादिनी साथ लीलाधर चक्रदेव, तानपुरासाथ डॉ. चारुदत्त देशपांडे व दर्शन कुलकर्णी यांनी केली. मध्यंतरानंतर श्रुती भावे (व्हायोलिन) व वरद कठापूरकर (बासरी) कलाकारांचे वादन झाले. त्यात प्रथम मारुबिहाग राग त्यानंतर मिश्र पिलूची धून व शेवटी ‘बगळ्यांची माळ फुले’ हे वसंतरावांचे गीत सादर केले ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचे गायन झाले. शास्त्रीय संगीतासोबत नाट्य संगीत, भावगीत यावर हुकुमत असलेल्या आशातार्इंनी राग जोग कंसमधील ‘कैसे गुनगाऊ तुमरे’ या बडाख्यालाने केली. जोड बंदीश ‘मैं तो आयो तोरे द्वार’ ही होती. हिंदी भाषेतील टप्पा, सोहनी रागातील रचना व पाठोपाठ दोन तराणे व रसिकाग्रहास्तव ‘सुरत पियाँ की’ हे नाट्यगीत सादर केले. संवादिनीसाथ लीलाधर चक्रदेव, तबलासाथ प्रसाद करंबळेकर यांनी केली. अरुण चितळे व स्नेहल कोकीळ यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)