शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डेटा सायन्स व सायबर सिक्युरिटीचे महाविद्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 20:11 IST

केंद्र शासनाने नोट बंदीची घोषणा केल्यानंतर देशभरातील नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता..

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे मागविले जाणार प्रस्तावसायबर सुरक्षेबाबत जागृती व्हावी याबाबत विविध स्तरावरून प्रयत्न विद्यापीठाने डेटा सायन्स व सायबर सुरक्षेबाबत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय

पुणे : गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन बँकिंग व्यवहारात वाढ होत चालली आहे. ऑनलाईन व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात या क्षेत्रात काम करणाऱ्या मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे डेटा सायन्स व सायबर सिक्युरीटी संदभार्तील नवीन महाविद्यालयाला संलग्नता दिली जाणार आहे. तत्पूर्वी विद्यापीठातर्फे हा अभ्यासक्रम तयार करून प्रथत: तो विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे.केंद्र शासनाने नोट बंदीची घोषणा केल्यानंतर देशभरातील नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. तसेच गेल्या काही वर्षांपासून बहुतांश सुशिक्षित नागरिकांकडून ऑनलाईन शॉपिंगसह, वीज बील भरणे, मोबाईल बील भरणे, चित्रपटचे तिकिट काढणे आशा अनेक व्यवहारांसाठी ऑनलाईन व्यवहार केले जातात. तसेच ऑनलाईन पध्दतीने एका व्यक्तीच्या खात्यामधून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा केले जात होतात. मात्र, या प्रक्रियेतून बँक खात्याची माहिती विविध ऍपच्या माध्यमातून हॅकर्सला उपलब्ध होऊ शकते. मोबाईलमध्ये आलेला ओटीपी क्रमांक अनोळखी व्यक्तीला सांगितल्यामुळे अनेकांच्या बँक खात्यातील रक्कम सध्या अचानकपणे गायब होत आहे. तसेच कॉसमॉस बँकेचे कोट्यवधी रुपये परदेशीतील हॅकरने काढून घेतल्याची घटनाही विसता येत नाही.केंद्र शासनाने ऑनलाईन बँकिंगला प्रोत्साहन दिले आहे. मात्र, सायबर सुरक्षेच्या बाबत नागरिकांकडूनच नाही तर बँकांकडूनही आवश्यक दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून येते. सायबर सुरक्षेबाबत जागृती व्हावी याबाबत विविध स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. परतु, विद्यापीठाने डेटा सायन्स व सायबर सुरक्षेबाबत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे लवकच यावरील अभ्यासक्रमहीही विद्यापीठात सुरू होईल.--शासनाच्या आराखड्यात डेटा सायन्स व सायबर सिक्युरिटी या विषयावर नवीन महाविद्यालयाचा समावेश केला आहे. त्यानुसार विद्यापीठातर्फे पुढील शैक्षणिक वषार्साठी शिक्षण संस्थांकडून हे महाविद्यालय सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव स्वीकारले जातील. सध्या विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेसमोर हा अभ्यासक्रम मान्यतेसाठी ठेवला जाईल.- डॉ. एन. एस. उमराणी, उप-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठdigitalडिजिटलonlineऑनलाइनcollegeमहाविद्यालय