शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

Winter Weather Alert: उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट अन् विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 20:28 IST

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाबरोबरच थंडगार वारे यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.

पुणे : उत्तरेकडून आलेले थंड वारे आणि त्याचवेळी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संगम झाल्याने एकाचवेळी उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर, विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस असे चित्र राज्यात दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाबरोबरच थंडगार वारे यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. 

राज्यातील सर्वात किमान तापमान नाशिक येथे ७.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्याचवेळी विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्याचवेळी कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात मंगळवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी पुढील ३ दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे १२, लोहगाव १३.४, अहमदनगर १२.४, जळगाव ९,  कोल्हापूर १६.९, महाबळेश्वर १०.४, मालेगाव १०.२, नाशिक ७.३, सांगली १५.९, सातारा १५, सोलापूर १६.७, मुंबई १५.२, सांताक्रूझ १३.२, अलिबाग १७.५, रत्नागिरी १९.१, पणजी १९.८, डहाणु १५.५, औरंगाबाद ११, अकोला १५.५, अमरावती १५.१, बुलढाणा १२.६, ब्रम्हपूरी १७.५, चंद्रपूर १७.२, गोंदिया १६.८, नागपूर १८.३, वाशिम १२, वर्धा १७.८.

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनRainपाऊस