शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

थंडीमुळे वाढले अपघात

By admin | Updated: December 23, 2014 05:34 IST

पहाटेच्यावेळी रस्त्यावरील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. वाढती थंडी हेदेखील अपघाताचे कारण ठरत आहे.

मंगेश पांडे, पिंपरीपहाटेच्यावेळी रस्त्यावरील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. वाढती थंडी हेदेखील अपघाताचे कारण ठरत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पडणारे धुके, वाहनांमध्ये अचानक घडून येणारे बिघाड, वाहनचालकाची बिघडणारी मानसिक स्थिती अशा कारणांमुळे अपघात होत असल्याचे स्पष्ट होते.शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांत ९ ते १० तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात सकाळच्या वेळी प्रवासाला जाताना विशेष काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शनिवारी एकाच दिवसात अपघाताच्या चार घटना घडल्या पैकी तीन अपघात सकाळी साडेसहा ते आठच्या सुमारास घडले. अपघाताची वेगवेगळी कारणे असली तरी बहुतेक अपघात वाढत्या थंडीमुळेही घडत असल्याचा निष्कर्ष जाणकारांनी काढला आहे. अनेकजण कामानिमित्त सकाळी लवकरच घराबाहेर पडतात. व्यावसायिकांसह नोकरदार सकाळीच घरातून निघतात. मात्र, वाहनांच्या सुस्थितीबद्दल दक्षता घेतली जात नाही. यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत. वाढत्या थंडीमुळे वातावरणात दाट धुके निर्माण होते. आहेत. यामुळे वाहनाच्या समोरच्या काचेवर दव जमा होतात. प्रवासादरम्यान समोरचे स्पष्ट दिसत नाही. रस्ताही लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. काचा स्वच्छ करण्यासाठी असणारया वायपरचा वापर केवळ पावसाळ्यातच केला जातो. इतर वेळी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अचानक त्याचा वापर करण्याची गरज भासल्यास अडचण निर्माण होते. यासाठी वायपर सुस्थितीत असणे गरजेचे आहे. धुक्यातून जाताना वाहनाची समोरील व मागील लाईट सुरू ठेवल्यास इतर वाहन चालकांना अंदाज येऊ शकतो. वाहनाचा वेग कमी असावा यामुळे वाहनाचे चाक रस्त्यावरील खड्ड्यात गेल्यास अथवा रस्त्यावरून खाली उतरून अपघात झाल्यास जिवितास धोका निर्माण होत नाही. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण मोटारीच्या काचा बंद करून ‘हिटर’ सुरू करतात. यामुळे मोटारीच्या आतील भागात गरम हवा निर्माण होते. चालकाची अपुरी झोप झाली असल्यास त्याला या गरम हवेने डुलकी लागते. थंडीत दुचाकीवर प्रवासाला जाताना हेल्मेटसह, स्वेटर, हातमोजे, पायात बुट असणे आवश्यक आहे. हेल्मेटविना दुचाकी चालविल्यास थंड हवा नाका-तोंडात गेल्याने डोके दुखून दुचाकीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. तसेच हातमोजे वापरणे आवश्यक आहे. अन्यथा ही साधी गोष्ट अपघातास निमंत्रण ठरू शकते. दुचाकीचे बहुतांशी नियंत्रण हँडलवरच असते. यासाठी बोटांचा उपयोग होतो. मात्र, कडाक्याच्या थंडीत हातमोजा नसल्यास थंडीने बोटे बधीर होणे अथवा आखडण्याचे प्रकार घडतात. यामुळे गिअर बदलण्यासाठीचा क्लच दाबणे, बे्रक दाबणे या प्रक्रियांवर परिणाम होतो. यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात घडू शकतात. शरीराचा थंडीपासून बचाव करण्याच्या नादात चालकाचे वाहनाकडे दुर्लक्ष होते. पार्किंगमधील वाहन बाहेर काढायचे अन् निघायचे इतकेच चालकाच्या नजरेसमोर असते. मात्र, थोडीशी चूकही अपघाताचे कारण ठरू शकते याचे गांभीर्य चालकाला नसते.