शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde on Chandani Chowk: एकनाथ शिंदे पुन्हा चांदणी चौकात येणार; आज दुपारी २ वाजता, पाहणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 12:43 IST

Eknath Shinde on Chandani Chowk: एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्याला निघाले होते.  मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा गेल्या शुक्रवारी चांदणी चौकात अडविण्यात आला होता. संतप्त पुणेकरांनी तुमच्या ताफ्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप केला होता. या प्रकारामुळे दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार चांदणी चौकात नवा नसून गेली कित्येक वर्षे वाहतूक कोंडी होत असते, त्यातच पुलांची बांधकामे रखडल्याने यात गेल्या दोन वर्षांपासून भर पडली आहे. 

एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्याला निघाले होते.  मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. यातच कामावरून घरी निघालेल्या  नागरिकांना प्रचंड वाहतुकीला सामोरे जावे लागले. यामुळे नेहमीच्या कोंडीला वैतागलेल्या नागरिकांनी शिंदेंचा ताफा अडविला आणि जाब विचारला.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.

आज एकनाथ शिंदे सातारा दौरा आटोपून मुंबईकडे निघणार आहेत. दुपारी दोन वाजता ते चांदणी चौकात येऊन तिथे चाललेल्या कामाची पाहणी करणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शिंदे यांचा ताफा अडविल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी चांदणी चौकात धाव घेतली. जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील १५ दिवसात परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या ९ लेनची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत असल्याने वाहतूकीची समस्या निर्माण होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPuneपुणे