शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सीएम चषक स्पर्धा : प्रथमेश पैठणकर, यमुना लडकतला दुहेरी मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:29 IST

भारतीय जनता युवा मोर्चा कसबा पेठ यांच्या वतीने आयोजित केलेल्या सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळात प्रथमेश पैठणकर व यमुना लडकत यांनी अनुक्रमे मुला-मुलींच्या गटात दुहेरी मुकुट संपादन केला.

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा कसबा पेठ यांच्या वतीने आयोजित केलेल्या सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळात प्रथमेश पैठणकर व यमुना लडकत यांनी अनुक्रमे मुला-मुलींच्या गटात दुहेरी मुकुट संपादन केला.सणस मैदानावर झालेल्या उडान मैदानी स्पर्धेत १०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलांच्या गटात प्रथमेश पैठणकर व मुलींच्या गटात यमुना लडकत यांनी प्रथम क्रमांक जिंकला. शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेत महिलांच्या गटात राजा शिवछत्रपती क्रीडा संस्था संघाने विजेतेपद जिंकले.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडला. या वेळी महापौर मुक्ता टिळक, मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, नगरसेवक हेमंत रासने, महेश लडकत, सम्राट थोरात, दीपक पोटे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, मनीषा लडकत, गायत्री खडके, भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष स्वरदा बापट, शहराचे सरचिटणीस उज्ज्वल केसकर उपस्थित होते.या स्पर्धेमधील विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील, असे प्रचारप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले.निकाल पुढीलप्रमाणे :इंद्रधनुष्य : चित्रकला : आर्यमान पंजाबी, दीपाली राव, साई पंडित. मेक इन इंडिया : रांगोळी : मेधा राजेंद्र बेलवडकर, भाग्यश्री साळवी, महेंद्र मेटकरी, मयूर दुधाळ, पूनम पोटे, सचिन साळवे.जलयुक्त शिवार : व्हॉलिबॉल (पुरुष विभाग) : अक्षय स्पोर्ट्स क्लब, एम. एस. स्पोर्ट्स क्लब. (महिला विभाग) : के.एस.एस. राठी, एम.एस. स्पोर्ट्स क्लब.उडान : अ‍ॅथलेटिक्स (१०० मीटर) (पुरुष विभाग) : प्रथमेश पैठणकर, समीर मुतालिक, मुसळेराम रामकृष्ण. (१०० मीटर) (महिला विभाग) : यमुना लडकत, साक्षी पागनीस, सिद्धी जाधव. (४०० मीटर) (पुरुष विभाग) : प्रथमेश पैठणकर, गणेश पांडे, मोहंमद मुजावर. (महिला विभाग) : यमुना लडकत, सिद्धी जाधव, तन्वी गोडसे.शेतकरी सन्मान : कबड्डी (पुरुष विभाग) : नूमवि कबड्डी संघ, सरस्वती क्रीडा संघ. (महिला विभाग) : राजा शिवछत्रपती क्रीडा संस्था, राजमाता जिजाऊ संघ.आयुष्यमान क्रिकेट स्पर्धा (पुरुष विभाग) : श्रमिक पत्रकार संघ, पुणे, व्हीकेसीसी, स्वराज्य ग्रुप.उज्ज्वला : डान्स स्पर्धा ग्रुप डान्स : क्युझेटीक्स किंग्ज ग्रुप, शिवांजली ग्रुप, जी अँड डी डान्स ग्रुप. उज्ज्वला : डान्स स्पर्धा सोलो डान्स : कार्तिक राणे, प्रणाली शितोळे, आर्या कोकाटे.उजाला : गायन स्पर्धा : पूर्वी बौराल, हर्षद देसाई, प्रमोद डाऊर, सिद्धार्थ कुंभोजकर. कौशल्य भारत : कॅरम स्पर्धा (पुरुष विभाग) : अनिल मुंडे, नईम शेख, योगेश कसबे. (महिला विभाग) : पुष्कनी भट्टड, ऋतुजा मराठे.‘खेळ’ हा आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देतो त्यामुळे खेळास प्राधान्य देऊ-गिरीश बापट .

टॅग्स :Puneपुणे