शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कमला नेहरू रुग्णालयातील ६ डायलिसीस मशिन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:31 IST

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील सहा डायलिसीस मशिन गेल्या दहा दिवसांपासून बंद पडल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.

पुणे : महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील सहा डायलिसीस मशिन गेल्या दहा दिवसांपासून बंद पडल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. शहरातील सुमारे ६३ रुग्ण नियमितपणे येथे डायलिसीससाठी येतात; परंतु मशिन बंद पडल्याने नियमित येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, वेळेत डायलिसीस न झाल्याने गरीब कुटुंबांतील दोन रुग्ण अत्यवस्थ आहेत. सध्या या दोन्ही रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डायलिसीस यंत्रणा तत्काळ सुरू करावीत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधीने दिला.कमला नेहरू रुग्णालयामध्ये तीन वर्षांपूर्वी गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसीस सुरू करण्यात आले. सुरुवातीला लायन्स क्लबकडून ही यंत्रणा राबविण्यात येत होती. मोफत सुविधेमुळे शहराच्या विविध भागांमधील गरीब रुग्णांचा ओघ वाढला आहे; परंतु दहा दिवसांपूर्वी अचानक एकाच वेळी सर्व मशिन दुरुस्तीला नेतो, असे सांगून नेण्यात आली आहेत. डायलिसीस ही अत्यावश्यक सेवा असताना ती अचानक बंद ठेवण्यामागे काही तरी काळेबेरे असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांनी केला आहे. अचानक सेवा बंद केल्याने नियमितपणे डायलिसीससाठी येणाºया रुग्णांचे हाल होत आहेत. यांपैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जावळे यांनी सांगितले.जावळे म्हणाल्या, की येथे होणाºया डायलिसीसचा आॅडिट रिपोर्ट करावा, अशी मागणी सातत्याने करीत आहोत; परंतु प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. डायलिसीस चालकाला पालिकेकडून दरमहा ६ ते ८ लाख बिल अदा केले जाते, अशी आमची माहिती आहे.डायलिसीस यंत्रणा तातडीने सुरू करण्याचा प्रयत्नकमला नेहरू रुग्णालयातील डायलिसीस मशिन गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. याबाबत संबंधित डायलिसीस केंद्र चालकासोबत केलेल्या कराराची तपासणी करून तातडीने त्याला नोटीस बजवावी, असे आदेश अधिकाºयांना दिले आहेत. डायलिसीस यंत्रणा तातडीने सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.- रामचंद्र हंकारे,आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

टॅग्स :Puneपुणे