शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

बंद दाराआड तलाठी ‘कारभार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:00 IST

सासवड तलाठी कार्यालयात सध्या दरवाजा बंद करून कामकाज केले जात आहे. दार बंद का आहे? कार्यालयाच्या कामकाजाची वेळ काय आहे? किती दिवस अशा प्रकारे काम चालणार याबाबत कोणताही सूचना फलक लावलेला नाही. सासवड मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील सर्वच शेतकरी सातबारा, फेरफार, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले घेण्यासाठी येत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड - सासवड तलाठी कार्यालयात सध्या दरवाजा बंद करून कामकाज केले जात आहे. दार बंद का आहे? कार्यालयाच्या कामकाजाची वेळ काय आहे? किती दिवस अशा प्रकारे काम चालणार याबाबत कोणताही सूचना फलक लावलेला नाही. सासवड मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील सर्वच शेतकरी सातबारा, फेरफार, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले घेण्यासाठी येत असतात. विविध महसुली कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील व सासवड शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.महसूल अधिकाºयांकडून कागदपत्रांच्या संगणकीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सासवड महसूल विभागाचे कामकाज कंत्राटदारी पद्धतीने केले जाते. कंत्रादाराकडून नेमण्यात आलेले कर्मचारी योग्य पद्धतीने काम करीत नाहीत.जुन्या लिखित स्वरूपातील सातबारा व नवीन आॅनलाइन सातबारावरील क्षेत्र, शेतकºयांची नावे यामध्ये अक्षम्य चुका होताना आढळतात. सातबारा देण्यास टाळाटाळ केली जाते किंवा मुद्दामहून विलंब केला जातो. तलाठी कार्यालय छत्रपती शिवाजी मार्केट सासवड या इमारतीत आहे. या ठिकाणी संगणक व प्रिंटर सर्व सुविधा असुनही तीन किलोमीटर लांब असणाºया सासवड तहसील कार्यालयात सातबारा आणण्यासाठी नागरिकांना पाठवले जाते.उताºयांच्या शुल्काची माहिती नाही मिळतआॅनलाइन सातबारा व फेरफार घेण्यासाठी किती शुल्क आकारले जाते, याचे शासकीय दरपत्रक कार्यालयात नाही. त्यामुळे अवास्तव दर आकारले जातात. त्यामुळे महसुली कागदपत्रांसाठी आकारले जाणारे शुल्काचे दरपत्रक लावणे गरजेचे आहे.तालुक्यातील ७/१२ अपडेशन हे वेगाने व अचूक व्हावे, यासाठी दोन भागात कामाचे नियोजन केले आहे. शेतकरी, शालेय विद्यार्थी व पालक यांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडळ अधिकारी कार्यालय, सासवड येथे एक खिडकी योजनेचे नियोजन करण्यात आलेले आहे.ज्या पालकांना आपल्या पाल्यांसाठी जातीचे, उत्पनाचे किंवा कोणत्याही प्रकारचे दाखले, ७/१२ हवे असतील त्यांनी अर्ज करून संबंधित गावच्या कोतवालांकडे जमा करावेत. हे दाखले एक खिडकी योजनेतून मिळतील, असे उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर संजय आसवले व तहसिलदार सचिन गिरी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या