शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरच्या वानरलिंगी सुळक्यावर चढाई करताना २०० फुट खोल दरीत पडला गिर्यारोहक, दाट झाडांनी दिले जीवदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 19:44 IST

आदिवासी भागातील घाटघर  जवळील जिवधन किल्याजवळ असणा-या वानरलिंगी सुळक्यावर चढाई करत असतांना एक गिर्यारोहक जवळपास २०० फुट खोल दरीत कोसळला.

जुन्नर:  आदिवासी भागातील घाटघर  जवळील जिवधन किल्याजवळ असणा-या वानरलिंगी सुळक्यावर चढाई करत असतांना एक गिर्यारोहक जवळपास २०० फुट खोल दरीत कोसळला. नशीब बलवत्तर असल्यामुळे तसेच दाट झाडीमध्ये लटकल्यामुळे या गिर्यारोहकाचा जीव वाचला. वनविभागाचे कर्मचारी तसेच जुन्नर येथील स्थानिक गिर्यारोहकांच्या ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या गिर्यारोहकाला सुरक्षित वाचवण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून शरण सावंत असे या जखमी गिर्यारोहकाचे नाव आहे. जुन्नर तालुक्याच्या  नाणेघाट परिसराच्या आदिवासी भागातील  घाटघर जवळील जिवधन किल्याजवळ  असणा-या  वानरलिंगी सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोह येत असतात. शनिवारी सकाळी वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहणासाठी  भोर येथून  आलेल्या प्रणय सावंत (वय १७) आणि  शरण सावंत (वय २२) या दोन  गिर्यारोहकांपैकी एक  गिर्यारोहक  शरण सावंत हा शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास सुळक्यावर  चढाई करत असताना २०० फूट खोल दरीत  कोसळला. नशीबाने साथ होती म्हणून २००  फूट खोल दरीत कोसळूनही केवळ झाडाला अडकल्याने  त्याचा जीव वाचला. वानरलिंगी सुळका चढण्यास सुरुवात केल्यानंतर पंधरा फूट उंचीवर  गेल्यावर शरण सावंत याच्या हाताला वेदना होऊ लागल्यामुळे त्यांच्या हाताची पडक सैल झाली. यामुळे त्याचा हात निसटल्याने वानरलिंगी सुळक्याच्या पश्चिमेला  बाजूला  दोनशे फूट खोल दरीत कोसळला. त्यावेळी त्याचा भाऊ प्रणय सावंत याने मदतीसाठी  आरडाओरडा केला. जवळच्या हॉटेलचे चालक सुभाष आढारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.  त्यांनी  याबाबत तातडीने जुन्नर पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी गिर्यारोहक असलेले  वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांना मदतिसाठी बोलवले.  पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, वनरक्षक  रमेश खरमाळे , घाटघर येथील सुभाष आढारी, नितीन शिंदे, हनुमंत भाल, सॅम पाडळे, एलेक्स मेंन्डोंसा, विलास रावते, विष्णू शिंदे, रोहीदास आढारी विनायक गोसावी, अक्षता मांढरे, तेजस पोटे, गौरव कांबळे  याबचाव पथकाने   चार तासाच्या प्रयत्ननांतर   या  गियारोहकाला वाचविले. या गिर्यारोहकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले  आहे.