शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गिर्यारोहकांनी बाण सुळका केला सर, तीस तासांच्या प्रयत्नानंतर मोहीम फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 21:30 IST

Pimpri-Chinchwad : अहमदनगर येथील साम्रद गावातील सांधण दरीजवळ असलेला ७१० फूट उंचीचा बाण सुळका गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतो.

पिंपरी : चढाईसाठी अवघड मानला जाणारा अहमदनगरमधील बाण सुळका पिंपरी-चिंचवडच्या मावळ्यांनी सर केला. तब्बल तीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर ७१० फूट उंचीचा सुळका सर करण्यात गिर्यारोहकांना यश आले.

पिंपरी-चिचंवड माउंटेनिअरिंग असोसिएशन, स्पोर्ट क्लाईम्बिंग असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आणि राजे शिवाजी क्लाईम्बिंग वॉल यांच्या संयुक्त प्रयत्नातून दहा जणांनी हा सुळका सर केला. अहमदनगर येथील साम्रद गावातील सांधण दरीजवळ असलेला ७१० फूट उंचीचा बाण सुळका गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतो. नावाप्रमाणे बाणासारखा हा कातळ आकाशाकडे झेपावला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, मधमाशांची मोठी पोळी, दुर्गम प्रदेश आणि खडतर चढाई अशा आव्हानांचा सामना गिर्यारोहकांना करावा लागतो.

या मावळ्यांनी एक जानेवारीपासून मोहिमेची तयारी सुरू केली होती. प्रत्यक्ष २५ जानेवारीला चढाईला सुरुवात झाली. त्यानंतर तीस तासांनी २६ जानेवारीला मोहीम फत्ते झाली. नीलराज माने, मोहन हुले, तुषार खताळ, गितेश बांगरे, रोहित मडके, नीलेश मोरे, जयवंत कोकणी, संतोष मांडे, तानाजी केकरे, मयूर केकरे हे मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते. माने आणि हुले यांनी सुळका सर केल्यानंतर तिरंगा फडकवित राष्ट्रगीताद्वारे मानवंदना दिली.

गेल्यावर्षी सेफ क्लाईम्बिंग इनिशिएटिव्ह (स्की) संस्थेने बाण सुळक्यावर नव्या मार्गाने चढाई करीत बोल्ट बसविले होते. याच मार्गाने चढाई करीत मावळ्यांनी बोल्टची चाचणी घेतली. गेल्या वर्षी स्कीच्या सदस्यांनी आखलेल्या मार्गामुळे चढाई सुकर झाल्याची भावना गिर्यारोहकांनी व्यक्त केली. पीसीएमए संस्थेचे संस्थापक सुरेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली. गिर्यारोहक सुनील पिसाळ, विवेक मराठे, स्वानंद जोशी, नरेंद्र पाटील, श्रीकृष्ण कडुसकर, नुवाजीश पटेल यांनी मार्गदर्शन केले.---------------बाण सुळका १९८६ साली झाला. प्रथम सरबाण सुळक्यावर १९८६ साली प्रथम यशस्वी चढाई करण्यात आली. दिवंगत गिर्यारोहक मिलिंद पाठक यांच्या संघाने ही मोहीम फत्ते केली होती. त्यानंतर विवेक मराठे यांच्या पथकाने १९९१ मध्ये हा कडा सर केला. स्की संस्थेच्या सदस्यांनी नव्या वाटेने चढाई करीत बोल्ट लावण्याचे आव्हानात्मक काम जानेवारी २०२० मध्ये केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAhmednagarअहमदनगर