शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलूनही पीक जोमात, बटाट्याला पोषक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:52 IST

कुरवंडी (ता. आंबेगाव) परिसरात रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा पीक हवामानात होणारे बदल घडवूनसुद्धा योग्य फवारणी केल्यानंतर जोमदार आले आहे. निसर्गाच्या विविध लहरी येऊनसुद्धा शेतकरी आपले पीक टिकावे म्हणून त्यावर औषधाचे प्रयोग करून ते पीक जगवून दाखवतो.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : कुरवंडी (ता. आंबेगाव) परिसरात रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा पीक हवामानात होणारे बदल घडवूनसुद्धा योग्य फवारणी केल्यानंतर जोमदार आले आहे. निसर्गाच्या विविध लहरी येऊनसुद्धा शेतकरी आपले पीक टिकावे म्हणून त्यावर औषधाचे प्रयोग करून ते पीक जगवून दाखवतो. हे कुरवंडी येथील रमेश दिलीप तोत्रे या शेतक-याने सिद्ध केले.एखादी रोगाची साथ यावी अन् पशुपक्षी पटापट मरावे, अशी अवस्था निसर्र्गाने केलेल्या लहरी हल्ल्याने शेतकºयांची झाली आहे. सध्या थंडी, ऊन, हलका पाऊस अशा बदलत्या वातावरणात जीव मुठीत ठेवून शेतकरी आपल्या पिकाला जपत आहे. कुरवंडी परिसरात रमेश तोत्रे या शेतकºयाने एक महिन्यापूर्वी आपल्या एक एकर शेतात पुखराज जातीचे बटाटा पीक घेतले.प्रतिक्विंटल ६०० रुपये दराने ११ कट्टे बटाटे लागवड केली. एक महिन्याचे पीक झाले असून, चालू हवामानात बटाट्याचा शेंड्याचा पाला कर्जळू लागला होता. त्यामुळे तातडीने औषधांची फवारणी करून युरिया खताचा वापर केला.योग्य पाणी दिले. खुरपणी करून चांगली काळजी घेतली. बारकाईने लक्ष दिले. त्यामुळे बदललेल्या हवामानातसुद्धा बटाटा पिकाने चांगले बाळसे धरले आहे.पीक तरारले. शेतकºयाप्रमाणे इतरांनी हवामानातील बदलांना सामोरे जाऊन पिकांची काळजी घेतली तर निकासानीपेक्षा योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन शेतकरी रमेश तोत्रे यांनी केले.वारंवार होणाºया हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावे, खते, औषधे, फवारणी, खुरपणी केल्यास पीक चांगले येऊ शकते. असा आशावाद शेतकºयांनी पीक उत्पादन घेताना ठेवला पाहिजे. कुरवंडी परिसरात अनेक शेतकरी कांदा, बटाटा, फरशी, लसूण आदी पिके घेतात; पण बदलत्या वातावरणात पिकेटिकविली पाहिजेत.थंडीचा ज्वारीपिकाला फायदामहुडे : भोर तालुक्यातील पश्चिम भागातील पिसावरे ,महुडे परिसरातील ज्वारी पिकाला अवकाळी पाऊस पडून गेल्याने आता थंडी पडू लागल्याने ज्वारी हे पीक अंत्यत चांगले दिसू लागले आहे.नीरा नदी व छोटे बंधारे यांच्या किनारी ज्वारीचे पीक घेतले आहे. यावर्षी चांगले हवामान व पिकासाठी पाणीसाठा पोषक ठरत आहे. या परिसरात गेल्या वर्षी हे पीक चागल्या प्रकारे होते . यावर्षी ज्वारीचे पीक जास्त आहे. या रब्बी पिकाचा चांगला फायदा शेतकºयास ज्वारी व जनावरांना कडबा मिळतो. कडबा हा जनावरांना फायदेशीर असतो. हवामान चागले नसेल तर तर हे पीक तोट्यात जाण्याची शक्यता असते. अचानक झालेल्या आवकाळीं पावसाने या पिकावरी रोगाचे प्रमाण कमी होऊन पिके जोमात दिसू लागली आहेत.

टॅग्स :newsबातम्याPuneपुणेagricultureशेती