शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी आळंदीत बोलक्या भिंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 02:00 IST

सन २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी चार हजार गुणांची स्पर्धा झाली. यावर्षी यात १ हजार गुणांची वाढ झाली आहे. यावर्षी ५ हजार गुणांसाठी स्पर्धा होत आहे.

आळंदी : आळंदी शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानास ४ जानेवारीपासून यावर्षी ही स्वच्छ सर्वेक्षण २०१९ उपक्रम राबविला जात आहे. या विशेष स्वच्छता अभियानमध्ये आळंदी नगरपरिषद सहभागी झाली असल्याने यासाठीचे कामकाज नगरपरिषदेने सुरू केले आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारीसमीर भूमकर यांनी दिली. यासाठी आळंदीत विविध भिंतींवर स्वच्छतेचे संदेश दिले जात असून या बोलक्या भिंती सर्वांचे आकर्षण ठरू लागले आहे.

सन २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी चार हजार गुणांची स्पर्धा झाली. यावर्षी यात १ हजार गुणांची वाढ झाली आहे. यावर्षी ५ हजार गुणांसाठी स्पर्धा होत आहे. मागील वर्षीप्रमाणे अधिकचा सहभाग स्थानिक प्रभागातील नगरसेवक तसेच नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, सामाजिक कार्यकर्ते यांचे योगदान अपेक्षित असल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी या तीर्थक्षेत्रासाठी अभियान राबवित गेल्या वर्षीपासून कामकाज सुरू झाले आहे. यावर्षी नगरपरिषदेने अधिक जनजागृती परिणामकारक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये पहिल्या १० नगरपरिषदांमध्ये आळंदीचे नाव आणण्यास संकल्प केला असल्याचे नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. देशातील नागरी भागातील शहरे अधिक सुंदर लक्षवेधी व बोलकी होण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने देखील सार्वजनिक रस्त्यालगतच्या भिंती अधिक बोलक्या करण्याचे काम हाती घेतले आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आळंदी शहरात सद्या कचराकुंडी मुक्त शहर व कचरामुक्त तीर्थक्षेत्र आळंदीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सुरू केले आहे. मागील वर्षापासून आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेत सहभागी झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षणांत या वर्षी पाच हजार गुणांच्या स्पर्धेत सेवास्तर, कचरा संकलन व वाहतूक, कचरा प्रक्रिया व विल्हेवाट, माहिती शिक्षण तसेच संवाद, हगणदरीमुक्त आळंदी आदींचा समावेश आहे.आळंदी नगरपरिषदेने तारांकित मानांकनासाठीदेखील प्रयत्न सुरु केले आहे. या अंतर्गत गुण मिळणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरात जाहिरात फलक जनजागृतीसाठी काम सुरू करण्यात आले आहे. स्वच्छता अ‍ॅप, व्यापारी वगार्साठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना सर्व्हेक्षणाच्या काळात प्रश्न विचारले जाणार आहेत. यासाठी समाज प्रबोधन केले जाणार आहे. युवक, तरुण नागरिकांनी नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात प्रशासनास सहकार्य करून आळंदीच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन स्वच्छतादूतांकडून केलेजात आहे. 

टॅग्स :Alandiआळंदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड