पाईट : सेंट व्हिन्सेंटस स्कूल पुणेला १५० वर्षे पूर्ण झालेच्या निमित्ताने पाईट येथील पापळवाडी येथे एनसीसीच्या विद्यार्थांकडून परिसर स्वच्छता अभियान तसेच शालेय विद्यार्थांना पुस्तके भेट देण्यात आली.पुणे येथील सेंट व्हिन्सेंटस या शैक्षणिक संस्थेस १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामीण भागातील पापळवाडी, पाईट येथे एनसीसी आर्मी नेव्ही एअरविंग या प्रकारातील ३२ विद्यार्थ्यांच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. येथील आयएसओ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सेंट व्हिन्सेंट शाळेतील १७ वर्षांखालील फुटबॉल टीमला मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेतून कथा, कादंबऱ्या, बुद्धिमत्ता विकासाची पुस्तके भेट दिली.(वार्ताहर)
एनसीसीच्या विद्यार्थांकडून स्वच्छता अभियान
By admin | Updated: February 13, 2017 01:21 IST