शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वावरताहेत तडीपार गुंड

By admin | Updated: February 7, 2017 03:09 IST

महापालिका निवडणुकीमुळे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रेकॉर्डवरील १७० गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी : महापालिका निवडणुकीमुळे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रेकॉर्डवरील १७० गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत तब्बल ३० गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तडिपारी आदेशाचा भंग करून शहरात वावरताना आढळून आलेल्या ८ गुंडांवर कारवाई केली आहे. आणखी २५ जणांवर कारवाई प्रस्तावित आहे. झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यानुसार आतापर्यंत पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती परिमंडळ तीनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी निवडणुकीच्या निमित्ताने मागील महिन्यात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. विविध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांसह संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महापालिका निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननी झाली. प्रचार सुरू झाला आहे, परिमंडळ तीनच्या हद्दीतील पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, सांगवी, वाकड, हिंजवडी आणि चतु:शृंगी या नऊ पोलीस ठाण्यांमधील दाखल गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात आले. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन विविध कलमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलून सहा महिन्यांपासून ते दोन वर्षे कालावधीपर्यंत सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करणे, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यानुसार कारवाई करणे, सीआरपीसी कायद्यानुसार कारवाई केली जाते. डिसेंबर २०१६पर्यत वर्षभरात १७० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुंडांना खंडणीविरोधी पथकाने थेरगावातून अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. संतोष खलसे (वय २७, रा. थेरगाव), संदेश लाजरस चोपडे (वय २८, रा. काळेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. परदेशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. (प्रतिनिधी)पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज१रमाबाई नगर येथील सराईत गुन्हेगार अरविंद नागनाथ साबळे (वय ३८) याच्यावर झोपडीपट्टीदादा कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. त्याची रवानगी कोल्हापूर, कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असताना, त्याने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १९ अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन वर्षांसाठी तडीपारी केली असताना देखील, कायद्याचे उल्लघंन करून राजरोसपणे वावरणाऱ्या अनेक तडीपार गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली. २भोसरीतील शिवदास शंकर गायकवाड (वय ३१,रा.शांतीनगर झोपडपट्टी,भोसरी) या गुंडासह एक आणि दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या गुंडांपैकी काही जण राजरोसपणे वावरत असताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ज्ञानेश्वर त्रिंबक नलावडे (वय २३, बालाजीनगर ), नितीन सदाशिव वाघमारे, समाधान माणिक मोरे (वय २०, भोसरी) , वाकड, हिंजवडी, खडकी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला तडीपार गुंड विशाल शहाजी कसबे (वय २०, रा. काळाखडक) याचा समावेश आहे. काही आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद१गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने चंदन सुरेंद्र सिंग (वय २८, गणेशनगर,थेरगाव) या आरोपीस बेकायदापणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. बेकायदा पिस्तूल बाळगणारे, तसेच पिस्तूल विक्री करणारे अशा काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. २परदेशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगलेल्या मुकेश ओमप्रकाश मंगोत्रा (वय २६, रा. संत तुकारामनगर) या तरुणास पोलिसांनी अटक केली त्याला पिस्तूल, तसेच जिवंत काडतुसे या मुद्देमालासह ताब्यात घेतले. चेतन विश्वकर्मा याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी विश्वकर्मा याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदा गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला निगडी पोलिसांनी जेरबंद केले. तुळशीराम नथुराम पोकळे (वय ३०, काळेवाडी) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला.