शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील वाढ पाहून शहरांचे नियोजन होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:51 IST

‘‘लोकमत’च्या वतीने आयोजित बिल्डिंग महाराष्ट्र चर्चासत्रातील सूर : नियोजनाअभावी बकालपणा वाढतोय, सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज

पुणे : लोकसहभाग, उत्तम प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय इच्छाशक्ती यांच्या समन्वयातूनच शहरांचा नियोजनबद्ध विकास होत असतो. हा ताळमेळ नसल्याने २०-२५ वर्षांपूर्वीच्या विकास आराखड्यावर (डेव्हलपमेंट प्लॅन) आत्ता काम होत आहे. राज्यात सर्वत्र हीच स्थिती असल्याने शहरे बकाल होत असल्याचे दिसून येते. भूतकाळातील चुका लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांचे नियोजन करण्याची गरज असल्याचा सूर ‘लोकमत’च्या चर्चासत्रातून निघाला.लोकमतच्या ‘विश्वकर्मा : द ड्रीम बिल्डर्स’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनाप्रसंगी ‘बिल्डिंग महाराष्ट्र’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते, पायोनियर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अनिल नायर, दिशा ग्रुपचे संचालक देवानंद कोटगिरे, पॉझीव्ह्यू कन्सल्टिंग पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विनीत देव, कॅलिक्स स्पेसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गौरव सोमाणी, साई इस्टेट कन्सलटंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित वाधवानी यात सहभागी झाले होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले.कोटगिरे म्हणाले, ‘‘लोकसहभाग, प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्ती यांवर विकास अवलंबून असतो. त्यामुळेच राज्यातील शहरे बकाल होत आहेत. या तिन्ही गोष्टींचा समन्वय होणे महत्त्वाचे आहे.’’सोमाणी म्हणाले, ‘‘बांधकाम क्षेत्रातील वाटचाल व्यवसायाकडून उद्योगाकडे झाली आहे. व्यवसायात आर्थिक शिस्त येत आहे. व्यावसायिकांवरील विश्वास वाढला आहे. रेरा कायद्यामुळे संघटितपणे काम करणाऱ्यांना फायदा झाला असून, असंघटितपणे एकत्र काम करीत आहेत. मात्र, असंघटित व्यक्तींना रेरानुसार काम करणे अवघड आहे.’’ग्राहकही रेरा कायद्याबाबत जागरूक झाले असल्याचे नायर म्हणाले. लीना सलडाणा यांनी सूत्रसंचालन केले.विकासात नियोजनाचे महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे जिल्ह्याच्या पुढील ४० ते ५० वर्षांच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यासाठी सिंगापूरच्या एका एजन्सीची मदत घेण्यात येत आहे. मागील चुका टाळून यापुढे काम करावे लागेल. नियोजन, परवानग्या आणि रेरा या तीन पातळ्यांवर पीएमआरडीएचे काम चालते. एखादा प्रकल्प चांगला असतो; मात्र नियोजनाअभावी त्याला रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधा देता येत नाहीत. त्यामुळे सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळतील, याची व्यवस्था करण्यात येत असून, त्यासाठी आॅनलाईन परवानगीचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. तसेच, सध्या वाहतुकीसह अन्य महत्त्वाच्या गोष्टींच्या नियोजनावर काम करीत आहोत.- किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमत