पिंपरी : शहर परिसरात दोनच दिवसात तापमानाचा पारा ११.४ झाला आहे. परिणामी शहारवासीयांना पुन्हा हुडहुडी भरल्याचे चित्र दिसु लागले आहे. पुढील दिवसात तापमान आणखी घट होईल, असा अंदाज पुण्यातील वेध शाळेने वर्तविला आहे. मागील पंधरा दिवसात शहरातील एकुण तापमान १६ डिग्री सेल्सिअस होते. अचानक झालेल्या जोरदार पावसाने वातवरणात गारवा वाढला आहे. सध्या ११.४ इतक्या तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेध शाळेने सांगितले आहे. शहराच्या वातावरणात अचानक होत असलेला बदलामुळे दवाखान्यात रुग्णांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. शहरात ताप, सर्दी, खोकला, त्वचेच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. तालेरा रुग्णालयाचे डॉ. विजय पवार म्हणाले, ‘‘थंडीत योग्य काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी उकळलेले पाणी प्यावे. सकाळच्या कोवळ््या उन्हात उभे राहिल्यास त्वचेला योग्य पोषण मिळु शकते.’’ (प्रतिनिधी)
शहरात थंडी पुन्हा वाढली
By admin | Updated: December 16, 2014 04:21 IST