शहरं
Join us  
Trending Stories
1
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
2
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
3
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
4
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
5
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
6
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
7
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
8
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
9
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
10
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
11
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
12
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
13
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
14
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
15
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
16
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
17
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
18
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
19
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!

शहर, जिल्ह्यात १० टक्के ग्राहक धान्यापासून वंचित; कंत्राटदारामुळे धान्याची उशिरा उचल

By नितीन चौधरी | Updated: December 4, 2024 09:08 IST

शहरात दर महिन्याला सरासरी ९१ ते ९२ टक्के आणि जिल्ह्यात ९८ टक्के धान्यवाटप होते

पुणे : ऐन दिवाळीत धान्यापासून वंचित राहिलेल्या ग्राहकांना नोव्हेंबरमध्येही धान्यापासून वंचितच राहावे लागले आहे. शहर आणि जिल्ह्यात सुमारे ९० टक्केच ग्राहकांना धान्यवाटप झाले आहे.

शहरात दर महिन्याला सरासरी ९१ ते ९२ टक्के आणि जिल्ह्यात ९८ टक्के धान्यवाटप होते. मात्र, नोव्हेंबरमध्ये कंत्राटदाराने धान्य उशिरा पोहचविल्याने जिल्ह्यातील ८ ते १० टक्के ग्राहक धान्यापासून वंचित राहिले आहेत. महिना संपल्याने या ग्राहकांना नोव्हेंबरचे धान्य डिसेंबरमध्ये मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ६ लाख २९ हजार ८९६ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना १ हजार ८५७ रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्याचे वाटप करण्यात येते. अंत्योदय योजनेत ७५४ टन गहू तर ९०७ टन तांदूळ दिला जातो. तर प्राधान्य योजनेत ४ हजार ७२० टन गहू व ७ हजार १८३ टन तांदूळ वाटप केला जातो. त्या त्या महिन्याचे धान्यवाटप ३० तारखेपर्यंत करावे लागते. यानंतर ई-पॉस मशीन बंद होतात. त्यामुळे उर्वरित ग्राहकांना धान्यवाटप करता येत नाही. महिन्याच्या धान्य वाटपावरच पुढील महिन्याचा धान्य कोटा दिला जातो.

नोव्हेंबरमध्ये धान्य वाटपाचा सावळा गोंधळ शहर व जिल्ह्यातही दिसून आला. दोन्ही ठिकाणी शेवटच्या आठवड्यापर्यंत धान्य पोच झाले नसल्याचे चित्र होते. जिल्ह्यात तर २८ तारखेपर्यंत १३ दुकानांमध्ये धान्याची पोच झालेली नव्हती. त्यामुळे सर्व ग्राहकांना धान्यवाटप होईल का अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत ५ लाख ७२ हजार १३३ अर्थात ९०.८२ टक्के ग्राहकांना धान्याचे वाटप झाले आहे.जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी ९९ टक्के ग्राहकांना धान्यवाटप होते. कंत्राटदाराने केलेल्या गोंधळामुळे रेशन दुकानदारापर्यंत धान्य वेळेत पोहचू शकले नाही. यामुळे नोव्हेंबर महिन्यात ५७ हजार ७६३ शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहिले आहेत.

शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानदारापर्यंत धान्य पोहचविण्याचे काम एकाच कंत्राटदाराकडे आहे. शहरातही सुद्धा उशिरा धान्य पोहचले. शहरात दर महिन्याला सरासरी ९१ ते ९२ टक्के धान्याचे वाटप होते. नोव्हेंबरमध्ये शहरात ८९ टक्के धान्याचे वाटप झाले आहे. धान्य उशिरा पोहचले तरीही वाटपावर काही परिणाम झाला नसल्याचा दावा अन्नधान्य वितरण विभागाकडून करण्यात आला आहे. या गोंधळामुळे धान्यवाटप करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात आला होता, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली होती. मात्र, प्रस्तावाला मान्यता मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शहरात दर महिन्याला सरासरी ९१ ते ९२ टक्के धान्याचे वाटप होते. धान्य उशिरा पोहचले तरी वाटपावर फार परिणाम झालेला नाही. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारMahayutiमहायुतीfoodअन्न