शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांत तक्रार करणार शहर काँग्रेस : बदनामीच्या फ्लेक्सची दखल; विश्वजित कदमांना पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:51 IST

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बदनामीचे बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले.

पुणे : प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बदनामीचे बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले. संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करणार असल्याची माहिती देण्यात आली. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या शहर शाखेची पहिली पसंती कदम हेच आहेत, असेही या वेळी ठासून सांगण्यात आले.कदम यांच्यासंदर्भात शहरात काही ठिकाणी तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार अशी टीका करणारे फलक शनिवारी पुण्यात लावण्यात आले होते. त्याबाबत खुलासा करताना पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, की पक्षाशी काहीही संबंध नसलेल्या लोकांनी केलेला हा उद्योग आहे. विश्वजित यांच्याबद्दल काँग्रेसला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठीच सर्व आघाड्यांचे प्रमुख एकत्र आले आहेत. असे बदनामी करणारे फलक लावणाºयांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी पक्षाची मागणी आहे. महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी लोकसभेच्या सन २०१९ मधील निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी काही जणांनी धडपड सुरू आहे. मात्र असे करून त्यांचे काहीही होणार नाही. गल्लीतील निवडणूक जिंकता येत नाही, कार्यकर्त्यांना निवडून आणता येत नाही व स्वप्नं मात्र खासदारकीची पा्हली जातात. उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, मात्र आमची पहिली पसंती विश्वजित कदमच आहेत, असे शिंदे म्हणाले. या वेळी आमदार शरद रणपिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख व कदम यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॅनर कोणी लावले त्यांचे स्पष्टपणे नाव का घेत नाही, असे विचारले असता बागवे यांनी काही लोक असंतुष्ट असतातच, त्यांना भाजपावाल्यांकडून फूस लावली जात आहे, असा आरोप केला. हिंमत असली असती तर त्यांनी नाव जाहीर केले असते, मग आम्हीही नाव घेऊन बोललो असतो, बांगड्या भरलेल्यांची दखल घ्यायचे कारण नाही, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीPuneपुणे