शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

शहरात प्लास्टिक, थर्माकॉल वापरण्यास पूर्णपणे बंदीचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 17:59 IST

शहरातील पाण्याचे स्त्रोत, तलाव, नद्या, नाले व पावसाळी गटारे यामध्ये कोठेही कचरा दिसत नसल्याचा हास्यास्पद दावा प्रशासनाने केला आहे.

ठळक मुद्देभाग -२ सेव्हन स्टार दर्जाची स्वच्छता- शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा

पुणे : संपूर्ण शहरामध्ये अविघटनशील प्लास्टिक बॅग्ज, पुनर्वापरास अयोग्य प्लास्टिक, स्टायलोफॉर्म, थर्माकोलच्या वापरास पूर्णपणे बंदी असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मुख्यसभेला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये म्हटले आहे. याशिवाय शहरातील पाण्याचे स्त्रोत, तलाव, नद्या, नाले व पावसाळी गटारे यामध्ये कोठेही कचरा दिसत नसल्याचा ठोस दावा केला आहे. परंतु आयुक्त सौरभ राव यांनी केलेले दावे कागदावरच आणि फसवे असल्याचे '' लोकमत'' च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.    केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण सन २०१९ मध्ये पुणे महापालिकेने देखील सहभाग घेतला आहे. परंतु प्रशासनाकडून शहरामध्ये ग्राऊंड लेव्हलला जाऊन प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा पुरस्कार मिळविण्यासाठी कार्यालयामध्ये बसून व  सल्लागारांच्या मार्फत कागदे रंगविण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. यामध्ये शहराला सेव्हन स्टार मिळण्यासाठी तुमच्या शहरामध्ये शंभर टक्के प्लास्टिक, थर्माकॉल बंदी असणे आवश्यक आहे. परंतु आजही शहरामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरु आहे. शहरातील सर्व भाज्यामंडई, लहान-मोठे व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरु आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरामध्ये सर्वत्र सर्रास व मोठ्या प्रमाणामध्ये थमार्कोलचा वापर सुरु असल्याचे लोकमतच्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.     याशिवाय शहरातील पाण्याचे स्त्रोत, तलाव, नद्या, नाले व पावसाळी गटारे यामध्ये कोठेही कचरा दिसत नसल्याचा हास्यास्पद दावा प्रशासनाने केला आहे. परंतु शहराच्या मध्यवस्तीमधून जाणारे पिण्याचे पाण्याचा मुठा उजवा कालव्याच्या दोन्ही बाजूने कच-याचे मोठ्या मोठे ठिग असल्याचे सर्वत्र दिसते. तर शहरातील मुळा-मुठा नद्यांची झालेली गटार गंगा पुणेकर रोज आपल्या डोळ््यानेच पहात आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षांत कात्रज, पाषण तलावांमध्ये थेड सोडपाणी सोडण्यात येत असून, याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे हे तलाव जलपर्णीमय होऊन गेले आहेत. शहरातील ओढे-नाले तर कचरा टाकण्यासाठीच्या हक्काच्या जागांच असल्याचे दिसून आले.     तर सार्वजनिक ठिकाणी, पावसाळी नाले, पाण्याचे स्त्रोत आदी ठिकाणी अस्वच्छता करणा-यांवर नियमित दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु महापालिकेच्या मुख्य इमरतीसह शहरात अनेक ठिकाणी थुंकडे, कचरा टाकण्याचे प्रकार सुरुच आहेत. महापालिका प्रशासनाकडून अस्वच्छता करणा-यावर कारवाई करण्यात येते, परंतु ही कारवाई देखील केवळ पुरस्कारांसाठी आकडेवारी दाखविण्यासाठीच असल्याचे शहरातील सार्वजनिक स्वच्छता पाहिल्यावर स्पष्ट होते. यामुळे  प्रशासनाने सेव्हन स्टार मिळविण्यासाठी केलेले दावे कसे खोटे आणि फसवे असल्याचे स्पष्ट होते. ------------------------लोका सांगे .. न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली. महापालिकेच्या वतीने पुणे शहरामध्ये प्लास्टिक बंदी लागू केली. परंतु सुरुवातील काही महिने प्रशासनाकडून नियमित  कारवाई करून कडक अंमलबजावणी सुरु केली होती. परंतु सहा महिन्यांनंतर महापालिकेकडून ही प्लास्टिक बंदी पायदळी तुडविण्यात येत असून, महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्याचे वाटप करणे आणि आता तर थेट प्लास्टिक पिशव्यांचे वाटप देखील सुरु झाले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे लोका सांगे.. आपण मात्र... असा झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsaurabh raoसौरभ राव