शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक व नोंदणी फी यांचा परतावा नागरिकांना मिळणार आता ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 03:29 IST

सोयीसाठी व पारदर्शक कारभारासाठी घेतला निर्णय

पुणे : मुद्रांक व नोंदणी फी परतावा मिळण्यासाठी नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाकडे सातत्याने हेलपाटे मारावे लागते. यामुळे ३० डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात मुद्रांक व नोंदणी फी परतावा नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने मिळणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी दिली.

नोंदणी व मुद्रांक विभागाने मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी तयार करण्यात आलेल्या आॅनलाईन परतावा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. सदर प्रणाली अर्जदारांकरिता विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांनी न्यायीकेत्तर मुद्रांकाचा किंवा दस्त नोंदणीसाठी शासनास भरलेल्या तथापि दस्त नोंदणी न केलेल्या नोंदणी फी चा परतावा मागणीसाठी अर्ज करण्यापूर्वी या प्रणालीमध्ये डाटा एन्ट्री करणे आवश्यक आहे. ही डाटा एन्ट्री करणे म्हणजे परताव्यासाठी अर्ज करणे असा अर्थ नसून डाटा एन्ट्री केल्यानंतर, संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित मुद्रांकासह अर्जावर रिफंड कोड नमूद करूनविहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या प्रणालीच्या वापरासंदर्भात आवश्यक असलेले प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.घरबसल्या समजेल माहितीआॅनलाईन परतावा प्रणालीमुळे परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी होणार असल्याचे कवडे यांनी सांगितले. पक्षकाराला परतावा प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे किंवा कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे. हे पोर्टलवर घरबसल्या समजणार आहे. त्या संदर्भातील एसएमएस येईल तसेच परतावा आदेश व इतर पत्रव्यवहार डाउनलोड करता येईल.

 

टॅग्स :Puneपुणे