शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगरमधील नागरिक सापांमुळे झालेत भयभीत; उद्योगनगरीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 12:49 IST

गवताचे वाढलेले प्रमाण, अस्वच्छता व प्रत्येक वसाहतीत आलेले जंगलाचे स्वरूप यामुळे उंदरांनी घातलेला धुमाकूळ, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे वालचंदनगर येथील नागरिक भयभीत झालेले आहेत.

ठळक मुद्देवाढलेल्या गवतामुळे उंदरांचा सुळसुळाट, विषारी सापांची संख्याही वाढलीशहरातील कॉलनीकडे कंपनी व्यवस्थापक मंडळाचे दुर्लक्ष

वालचंदनगर : वालचंदनगर शहरातील गवताचे वाढलेले प्रमाण, अस्वच्छता व प्रत्येक वसाहतीत आलेले जंगलाचे स्वरूप यामुळे उंदरांनी घातलेला धुमाकूळ, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे येथील नागरिक भयभीत झालेले आहेत. घोणस, नाग, मन्यार अशा विषारी सापाचे वाढलेले प्रमाणामुळे वालचंदनगर शहर नावाऐवजी सर्पनगरी नावाने ओळखले जावे, असे लेखी निवेदन कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकारी जे. के. पिल्लाई यांना देण्यात आलेले आहे. वालचंदनगर शहराची स्थापना शंभर वर्षापूर्वी वालचंद हिराचंद दोशी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केली. कामगारांच्या हितासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणारा देशातील पहिले शहर म्हणून वालचंदनगर शहराची ओळख आहे. या शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, दवाखाने सर्वच काळजी घेण्यात आलेले होते. परंतु कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाच्या दुर्लक्षामुळे वालचंदनगर शहरात जंगलाचे स्वरूप आलेले आहे. प्रत्येक कॉलनीत वाढलेल्या गवतामुळे उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे विषारी सापांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. परिसरात विषारी सर्प आढळून येत आहेत. या शहरातील कॉलनीकडे व्यवस्थापक मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने अनेक खोल्यांची पडझड झालेली आहे. यामुळे हिंस्र प्राण्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वालचंदनगर शहराचे वैभव या व्यवस्थापकीय मंडळीने नामशेष करण्याचा सपाटा लावल्याने वालचंदनगर नावाने ओळखण्याऐवजी सर्पनगरी या नावाने ओळखण्याची वेळ आलेले आहे. त्वरित या शहरातील प्रत्येक कॉलनीतील गवताचे वाढलेले प्रमाण काढण्यात यावे व येथे स्वच्छता करण्यात यावी अन्यथा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महादेव मिसाळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणे