शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पेट्राेल दरवाढीची लुटमार थांबणार कधी ; नागरिकांचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 19:27 IST

गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने हाेणाऱ्या पेट्राेलच्या दरवाढीला सामान्य नागरिक कंटाळले असून सरकार विराेधात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत अाहेत.

पुणे : गेल्या दहा दिवसांमध्ये सातत्याने पेट्राेलच्या किंमतींमध्ये वाढ हाेत असल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रीया अाता उमटत अाहेत. पुण्यात पेट्राेलचे बुधवारी दर हे 84. 80 रुपये इतके हाेते. गेल्या काही दिवसांमध्ये दरवाढ एकदाही कमी न हाेता सातत्याने वाढत अाहे. ज्या भाजपाने सत्तेवर येण्याअाधी पेट्राेलचे भाव नियंत्रित ठेवण्याचे अाश्वासन दिले हाेते. तेच अाता दरवाढ करत असल्याने सामान्य नागरिकांची लुटमार थांबणार कधी असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत अाहेत. 

    नुकताच पेट्राेलच्या दरामध्ये 30 पैशांनी वाढ झाली अाहे. त्यामुळे राज्यातील सर्वच ठिकाणी पेट्राेलचे दर हे 85 रुपयांपर्यंत पाेहचले अाहेत. या दरवाढीमध्ये सामान्य नागरिक भरडला जात अाहे. लाेकमतने या दरवाढीबाबत सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या. प्रसाद कदम हा विद्यार्थी म्हणाला, भाजप सरकारने सत्तेवर येताना पेट्राेलची दरवाढ कमी करु असे अाश्वासन दिले हाेते. परंतु अाता इतकी दरवाढ केली असताना ते एक शब्दही बाेलायला तयार नाहीत. कर्नाटकच्या निवडणुकीच्या पत्रकार परिषदेत एकाने या दरवाढीबाढीबाबत अमित शहांना प्रश्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही. भाजप सरकारने जनतेची चेष्टा चालवली अाहे. ही दरवाढ करताना सामान्य नागरिकांचा कुठेही विचार केला जात नाही. दैनंदिन अायुष्य जगणं सामान्य नागरिकांना मुश्किल झाले अाहे. नागरिकांच बजेट कुठेतरी काेसळून पडत अाहे. मी पुण्यात शिक्षणासाठी राहताे. त्यामुळे माझा खर्च भागवणे मला मुश्किल जात अाहे.     भाजप सरकारची लुटमार चालू असल्याची संतप्त प्रतिक्रीया अरुण फडणीस यांनी व्यक्त केली. दाद मागायची तरी काेणाकडे तसेच निषेध तरी काेणाकडे नाेंदवायचा असा प्रश्न अाम्हाला पडला अाहे. या दरवाढीत सामान्य माणूस भरडला जाताेय. पेट्राेल जीवनावश्यक वस्तू असल्याने नागरिकांना त्याशिवाय पर्याय नाही. या दरवाढीवर काेणाचाही अंकुश राहिला नाही. पूर्वीच्या सरकारच्या काळात वर्षातून एकदा पट्राेल दरवाढ हाेत असे. अाता दरराेज दर वाढतायेत. सराकारच्या बाेलण्यात काहीच तथ्य नाही. सत्तेवर येण्याअाधी दिलेल्या अाश्वासनांचा सरकारला विसर पडलाय. त्यामुळे अाता माेदींच्या नव्या अाश्वासनांवर विश्वास तरी ठेवायचा कसा. पेट्राेलवर इतके कर कशासाठी याचेही उत्तर सरकारकडे नाही. असेही फडणीस म्हणाले.         गाैरी गाेसावी या गृहिणी म्हणाल्या, अाधी महिन्याला 1500 रुपयांचे पेट्राेल लागत हाेते अाता 2500 रुपयांचे लागते. सततच्या दरवाढीमुळे स्वतःचे वाहन कुठे बाहेर घेऊन जाणे अवघड झाले अाहे. कुठे बाहेर गावी जायचे असेल तर सार्वजनिक वाहतूकीशिवाय अाता पर्याय उरला नाही. शहरात फिरण्यासाठी अाता सायकल वापरण्याचा विचार अाहे. व्यावसायिक असलेल्या वैजयंती महाशब्दे म्हणाल्या, पेट्राेल दरवाढीतून सराकर त्यांचे उत्पन्न वाढवत अाहे. पेट्राेल अशी गाेष्ट अाहे की जीचा साठाही नागरिक करु शकत नाहीत. सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा हा सगळा प्रकार अाहे. जीएसटी व इतर कर घेत असताना पेट्राेलवर इतर कर का लावले जातायेत असा प्रश्न पडताे. सरकारने तातडीने या दरवाढीवर उपाय शाेधायला हवा. 

    माहिती अधिकार कार्यकर्ते कुलदीप अांबेकर म्हणाले, माेदी सरकारने जगणं मुश्कील केले अाहे. जीवानावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत असताना याकडे दुर्लक्ष केले जात अाहे. महागाई कमी करु असे अाश्वासन देऊन माेदी सत्तेत अाले हाेते. परंतु पेट्राेलच्या किंमती पाहता सर्वसामान्य व विद्यार्थ्यांच्या अावाक्याबाहेर त्या अाता गेल्या अाहेत. वाहन चालवूच नये अशी परिस्थीती सरकारने केली अाहे.

टॅग्स :PuneपुणेPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा