शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्याची संधी, आमदार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 18:07 IST

अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्यास संधी देण्यात आली असून हि नोंदणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली.

चाकण - अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्यास संधी देण्यात आली असून हि नोंदणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली.

आमदार सुरेश गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने परिपत्रक काढून वाहनांची कायदेशीर नोंदणी करण्यास मार्च २०१८ पर्यंत मुदत दिली आहे. दि.३१ मार्च २०१८ नंतर वाहनांवर होणाऱ्या कार्यवाहीबाबत कोणत्याही प्रकारची विनंती विचारात घेतली जाणार नसल्याने ३१ मार्चपूर्वीच वाहन चालकांना हि कायदेशीर नोंदणी करावी लागणार आहे. खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. अशी वाहतूक करताना बेकायदेशीर / सफेद नंबर प्लेट असलेल्या रिक्षांचे अपघात झाल्यास त्यात मुत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचेकडे अनेकदा व्यथा मांडून या समस्येकडे लक्ष वेधून घेतले. तसेच अधिवेशनामधे सभागृहात सदर विषय विविध मार्गाने मांडला होता.

तरुणांना रोजगार टिकावा यासाठी अशा प्रकारची अवैध प्रवासी वाहने कायदेशीर करण्यासाठी आमदार सुरेश गोरे यांच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने परिवहन मंत्री यांनी शासन निर्णय काढून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णयानुसार अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा अथवा इतर प्रवासी वाहनांना कायमस्वरूपी कायदेशीर करण्याकरिता परिवहन विभागामधे नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी वाहनाच्या वयानुसार नोंदणीकरिता विशिष्ट शुल्क ठरवून दिले आहे. या शासन निर्णयाद्वारे बेकायदेशीर /अवैध प्रवासी वाहनांना कायदेशीर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता मार्च २०१८ पर्यंत मुदत दिली आहे.

  महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ चा नियम, २०१७ या नियमानुसार खालील प्रमाणे परवाना शुल्क आकारण्यात येईल.

१) ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास, १००० रुपये२)  ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून एक वर्षापेक्षा अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास २००० रुपये३) ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून दोन वर्षापेक्षा अधिक आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास ३००० रुपये४) ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून तीन वर्षापेक्षा अधिक आणि चार वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास ४०००रुपये५) ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्यास ५००० रुपये