शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

तुकडेबंदीच्या फेरफार नोंदी न करण्याबाबत परिपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 15:12 IST

विभागातील अथवा बिगरशेतीतील तुकडेजोड व तुकडेबंदीतील फेरफाराच्या नोंदी नियमित करण्याकामी चालू बाजारभाव मूल्याच्या २५ टक्के शासनदरबारी भरल्यास गुंठेवारीच्या नोंदी नियमित होणार आहेत.

ठळक मुद्देशेती व नाविकास झोनमधील गुंठेवारीच्या नोंदी मंजूर होणार नसल्याने नागरिक हवालदिल तीन वर्षांपूर्वी शेती व नाविकास झोनमधील गुंठेवारीच्या नोंदी नियमित केलेचा कायदा पारित होणार

लोणी काळभोर : ‘हवेली तालुक्यात तुकडेजोड तुकडेबंदीच्या तरतुदी लागू होणाऱ्या फेरफार नोंदी न करण्याबाबत तहसीलदार सुनील कोळी यांनी सुधारित परिपत्रक जारी केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व मंडलाधिकारी व तलाठी यांना दिले आहेत. परंतु, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० अन्वये रजिस्टर दस्तावेजाची फेरफार नोंद घेणे क्रमप्राप्त असल्याने गावकामगार तलाठ्यांची कोंडी झाली आहे. बिगरशेती केलेली जमीन नियमाधीन केलेच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीमध्ये न वापरल्यास जमीन जिल्हाधिकारी संबंधित जमीन सरकारजमा करतील, असे स्पष्ट निर्देश परिपत्रकात असल्याने अनेकांनी या परिपत्रकाची धास्ती घेतली आहे.   धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत १९४७ मध्ये कायदा करण्यात आला. त्याबाबत सुधारणा अधिनियम २०१७ ला लागू करण्यात आला. अधिनियमाच्या तरतुदीच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतर अथवा विभाजन हे प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक, निमसार्वजनिक किंवा कोणत्याही बिगरशेती वापरात उद्देशित केले असेल तर चालू शासकीय बाजारभावाच्या पंचवीस टक्के रक्कम नजराणा घेऊन नियमित होणार आहे. म्हणजेच रहिवास विभागातील अथवा बिगरशेतीतील तुकडेजोड व तुकडेबंदीतील फेरफाराच्या नोंदी नियमित करण्याकामी चालू बाजारभाव मूल्याच्या २५ टक्के शासनदरबारी भरल्यास गुंठेवारीच्या नोंदी नियमित होणार आहेत. मात्र शेती व नाविकास झोनमधील गुंठेवारीच्या नोंदी नियमित होणार नाहीत.  जर जमीन खरोखरच अकृषक वापरणे यासाठी नियमाधीन केली असल्यास त्या दिवसापासून पाच वर्षांच्या कालावधीमध्ये खरोखरच अकृषक वापरासाठी न वापरल्यास संबंधित जमीन सरकारजमा होणार आहे. त्यानंतर या जमिनीस लागू असलेल्या शेजारच्या गट नंबरमधील धारकाला, भोगवटादारास जमिनीच्या बाजारमूल्याच्या ५० टक्के रक्कम शासकीय तिजोरीत अदा केल्यावर संबंधित सरकारजमा केलेली जमीन प्रदान करता येणार आहे. पन्नास टक्के रक्कमेच्या तीन चतुर्थांश रक्कम ज्या व्यक्तीकडून सरकारजमा केली होती अशा कसूरदार व्यक्तीला प्रदान करण्यात येईल, गोळा झालेल्या रकमेच्या उर्वरित एक चतुर्थांश रक्कम शासनास मिळणार आहे. जेव्हा शेजारच्या गटातील भोगवटादार संबंधित तुकडा खरेदी करण्यास असमर्थ असेल किंवा पन्नास टक्के रक्कम भरू शकत नसेल तर त्या जमिनीच्या तुकड्याचा लिलाव करण्यात येईल आणि त्यातून येणारे उत्पन्न कसूरदार व्यक्ती व शासन यांच्यामध्ये ३:१ या प्रमाणात वाटप होईल, असे स्पष्ट निर्देश हवेली तहसीलदारांच्या परिपत्रकात आहेत.

परिपत्रकानुसार रहिवास क्षेत्रातील गुंठेवारीच्या नोंदी करण्याकामी चालू बाजारभाव मूल्याच्या २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे व त्यानंतरच यातील गुंठेवारीची नोंद मंजूर होणार आहे. मात्र यापूर्वी रहिवास क्षेत्रात गुंठेवारीच्या नोंदी कोणताही नजराणा न भरता मंजूर झालेल्या आहेत. शेती व नाविकास झोनमधील गुंठेवारीच्या नोंदी मंजूर होणार नसल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. ...........तीन वर्षांपूर्वी शेती व नाविकास झोनमधील गुंठेवारीच्या नोंदी नियमित केलेचा कायदा पारित होणार असल्याने जिल्ह्यातील एका आमदाराने शिरूर व हवेलीमध्ये मोठे सत्कार स्वीकारले होते.  प्रत्यक्षात रहिवास झोनमधील गुंठेवारीच्या नोंदी नियमित होणार आहेत. त्यासाठी पंचवीस टक्के रक्कम नजराणा भरावी लागणार असल्याने आमदार महोदयांचा सत्कार समारंभ करणारी मंडळी तोंडावर पडली आहेत.......हवेली तहसीलदारांनी काढलेल्या परिपत्रकाविषयी काहीही माहिती नाही. त्यांनी कशाच्या आधारे, कोणत्या अधिनियमान्वये परिपत्रक काढले, याची माहिती घेत आहोत.- प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे विभाग 

टॅग्स :Puneपुणे