शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील देखावे पूर्ण करण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:37 IST

लाडक्या बाप्पाचे जल्लोष अन् उत्साहात स्वागत केल्यानंतर आता घरोघरी गणेशभक्त ‘श्रीं’च्या सेवेत मग्न झाले आहेत, तर बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पाहण्यासाठी खुले करण्याची लगबग सुरू झाली आहे.

पुणे : लाडक्या बाप्पाचे जल्लोष अन् उत्साहात स्वागत केल्यानंतर आता घरोघरी गणेशभक्त ‘श्रीं’च्या सेवेत मग्न झाले आहेत, तर बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पाहण्यासाठी खुले करण्याची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवातील दुसºया दिवशी अनेक मंडळांनी देखाव्यांवर अखेरचा हात फिरवला. मात्र, वरुणराजाच्या हजेरीने काही मंडळांना देखावे खुले करता आले नाहीत. तसेच पावसामुळे अनेक पुणेकर देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत.शहरातील गणेशोत्सव म्हटले, की ऐतिहासिक मिरवणुका आणि आकर्षक देखावे. त्यानुसार शुक्रवारी गणेश मंडळांसह घरोघरी गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले. अनेक जण दुसºया दिवसापासून शहरातील मानाचे पाच गणपती, तसेच दगडूशेठ हलवाई व इतर मोठ्या गणपतीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडतात. त्याचप्रमाणे खास देखावे पाहण्यासाठी बाहेरगावाहून शहरात येणाºयांची संख्याही मोठी असते. त्यानुसार शनिवारी गणेशोत्सवातील दुसºया दिवशी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना देखावे सज्ज करण्याचे वेध लागले होते. अनेक मंडळांनी पहिल्या दिवसापासून देखावे खुले केले आहेत. विद्युत रोषणाईसह सामाजिक घटनांचा वेध घेणारे, राजकीय सद्य:स्थितीवर भाष्य करणारे, देशभक्ती, ऐतिहासिक-पौराणिक, देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकृतींच्या प्रतिकृती असे विविध विषय घेऊन शहरातील गणेश मंडळे दरवर्षी आकर्षक देखावे तयार करतात. स्थिर, हलत्या तसेच जिवंत देखाव्यांमधून सामाजिक प्रबोधन करणाºया देखाव्यांचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढत आहे. यंदाही अनेक मंडळांनी त्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाईकडेही मंडळाचा कल आहे.- अनेक गणेशभक्तांनी शनिवारी कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या मानाच्या पाच गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पावसाळी वातावरणामुळे या ठिकाणीही तुलनेने गणेशभक्तांचे प्रमाण कमी होते. रविवारी पावसाने उघडीप दिल्यास रस्ते गर्दीने फुलून जातील.गणरायाच्या आगमनापासूनच पावसाने हजेरी ंलावल्याने काही मंडळांना देखावे पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही मंडळांचे देखावे दुसºया दिवशीही खुले झाले नाहीत. तसेच शनिवारीही दिवसभर तसेच सायंकाळीही पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. त्यामुळे रस्त्यांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. मात्र, अनेकांनी पाऊस अंगावर झेलत देखावे पाहण्याचा आनंद लुटला.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव