शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हॉटेल गारवाचे मालक यांच्या मारेकऱ्यांना सिनेस्टाइल अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : व्यावसायिक वैमन्यस्यातून झालेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : व्यावसायिक वैमन्यस्यातून झालेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेल्या दोन फरार आरोपींना गुन्हे शोध पथकाने लातूर येथून सुमारे १० ते १२ किलोमीटर सिनेस्टाईल थरारकपणे पाठलाग करून अटक केली. खून करणारा आरोपी अल्पवयीन असून दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकूण १० जणांना अटक केली आहे.

पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी माहिती दिली. हडपसर परिसरातील १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलांसह त्यांचा साथीदार निलेश मधुकर आरते (वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर) या दोघांना लातूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. यापुर्वी बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५६), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता.हेवेली), निखिल मंगेश चौधरी (वय २०), गणेश मधुकर माने (वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय २३, रा उरुळी कांचन), अक्षय अविनाश दाभाडे (वय २७, रा.सोरतापवाडी), करण विजय खडसे (वय २१, रा. माकडवस्ती सहजपूर, ता दौंड), सौरभ कैलास चौधरी (वय २१, रा खेडेकर मळा) यांना अटक करण्यात आली आहे.

रविवारी (दि. १८) रात्री ८.३० च्या सुमारास उरूळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांचा एका अल्पवयीन आरोपी आणि नीलेश आरते या दोघांनी मिळून खून केला होता. यानंतर दोघे दहशत माजवत फरार झाले होते. जखमी आखाडे यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (दि २०) मृत्यू झाला होता. कोणताही सबळ पुरावा अथवा माहीती नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, राजु पुणेकर, अमित साळुके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संतोष अंदुरे, संदीप धनवटे, सतीश सायकर, बाजीराव वीर, निखील पवार, गणेश भापकर, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुके हे तपास करत होते. तपासात त्यांना अशोका हॉटेलचे मालक जयवंत खेडेकर यांचा भाचा सौरभ उर्फ चिम्या याचा या कटात सहभाग असल्याची माहीती मिळाली. त्यांनी त्याला अटक केली. हॉटेलचा व्यवसाय वाढवण्याचे उद्देशाने तसेच हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतुन त्यांचा भाचा सौरभ उर्फ चिम्या व इतर यांना दररोज एक ते दोन हजार देण्याचे सांगुन आखाडे यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे त्याने सांगितले. मुख्य हल्लेखोर फरार झाले होते. पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रीक विश्लेष्णाच्या आधारे सात दिवस सतत तपास करत फरारी दोघांचा अहमदनगर, बार्शी, सोलापुर, लातुर, उस्मानाबाद जिल्ह्यात शोध घेतला. दोघे आरोपी हे लातुर येथील गांधी चौक येथे गेले असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. शनिवारी (दि २४) सापळा रचत आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेवुन दुचाकीवरून पळुन जावु लागले. पोलिसांनी त्यांचा सुमारे १० ते १२ किलोमीटर थरारकपणे पाठलाग केला व त्यांना पकडले. यांतील अल्पवयीन मुलावर दरोड्याची तयारी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर आरते हा पुणे शहर व पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष काळे (गुन्हे) हे करीत आहेत.