शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभकरांचा गुदमरतोय श्वास ! औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:52 IST

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.

कुरकुंभ - कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनीक प्रकल्पात रासायनिक व इंजिनीअरिंग असे दोन विभाग करण्यात आले आहेत. ग्रामस्थ व नागरिकांनी वारंवार तक्रारी करु नही प्रदुषणाला आळा घालण्याकडे कंपनी कानाडोळा करीत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.या प्रकल्पातून उत्पादित होणारे वायू प्रदूषण रोखण्याचे नवीन आव्हा न उभे ठाकले आहे. मागील ३० वर्षांपासून या घातक प्रक्रियेतून उत्सर्जित होणाऱ्या वायुमुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदुषित हवेचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कुरकुंभच्या लोकवस्तीपासून अगदी जवळच टायर जाळण्याच्या दोन कंपन्यांना परवानगी दिली गेली आहे. यामध्ये रोज जवळपास वीस टन टायर जाळले जातात. त्यापासून उत्सर्जित होणा-या काळ्या धुरापासून व त्यामधून निघणाºया प्राणघातक वायूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कुरकुंभ परिसरात जाणवत आहे.औद्योगिक परिसरातील विविध कंपनीतील प्रदूषणाचा प्रश्न सध्या खूप भेडसावत आहे. कंपन्या अगदीच गावालगत असल्याने याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. नागरिकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवून तालुक्यातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वापरून सामान्य नागरिकांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत कंपनीला बंद करण्याचा ठराव घेण्यात आला असून कंपनी मालकांना तो पाठवण्यात आला आहे- रशीद मुलाणी,प्रभारी सरपंच, कुरकुंभकंपनीच्या आसपासच्या भागातील परिसर काळवंडलाटायर जाळण्याच्या प्रक्रियेच्या कंपन्या इंजिनिअरिंग झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना परवाना देताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने संपूर्ण परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊनच परवाना देणे आवश्यक होते. कंपनीच्या माध्यमातून होणाºया वायू प्रदूषणाच्या तक्रारी आल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांशी चर्चा झाली असून त्यांना तत्काळ याबाबत निर्णय घेण्याबाबत सांगितले आहे.- विजय पेटकर, उपअभियंता अधिकारी,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कुरकुंभ

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणnewsबातम्या