शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विशेष प्रार्थनेने पुण्यात ख्रिसमसचे स्वागत; अवघी तरुणाई रस्त्यावर, बाजारपेठा सजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 11:49 IST

शहरात रात्री विशेष प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला.

ठळक मुद्देविद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते शहरातील मध्यवर्ती भागात प्रसिद्ध चर्च रात्री दहा वाजता केले होते शहरामधील चर्चमध्ये वॉच नाईट सर्व्हिस या विशेष प्रार्थनेचे आयोजन

पुणे :  ख्रिस्ती बांधवांसह शहरातील विविध चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या उत्सुकतेने भारावलेले  वातावरण, या जन्मसोहळ्याच्या तयारीत रममाण झालेले ख्रिस्ती कुटुंबे, धर्मगुरूंसह ख्रिस्ती बांधवांच्या चेहऱ्यावर तरळणारे शुद्ध आनंदाचे भाव यांसह विविध शहरात रात्री विशेष प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला़ नाताळची पूर्वसंध्या आणि रविवार असा योग साधल्याने  दिवसभर शहरात विशेषत: कॅम्पमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ नाताळ म्हणजे ख्रिस्त जन्माचा सण जगभर साजरा केला जातो. नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये बालचमूंसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मध्यवर्ती भागात प्रसिद्ध चर्च विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. या वेळी सर्व चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील विविध मंडळांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे तयार केले होते. जंगलीमहाराज रस्त्यावर ख्रिस्ती बांधवांनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री दहा वाजता शहरामधील चर्चमध्ये वॉच नाईट सर्व्हिस या विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते. 

चर्चना आकर्षक सजावट; धार्मिक कार्यक्रमविमाननगर : प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मसोहळ्यानिमित्त पूर्वसंध्येला विमाननगर, वडगावशेरी, येरवडा परिसरात आकर्षक सजावट, मास प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सैनिकवाडी येथील ख्राईस्ट द किंग चर्च येथे आकर्षक सजावट, रोषणाई व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला येशूख्रिस्तांच्या जन्मसोहळ्यानिमित्त गायनवृंदाने नाताळ सणाची गाणी सादर केली. मुख्य जन्मसोहळ्यात प्रमुख धर्मगुरू फादर लॉरेन्स अल्मिडा यांनी या कार्यक्रमात प्रार्थना (मास) प्रवचन व मार्गदर्शन केले. यानंतर सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नाताळ सणाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. केक व चहापानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. ख्रिसमसच्या दिवशी (आज) सकाळी आठ ते सव्वानऊ पर्यंत मराठी भाषेत व सव्वानऊ ते सव्वादहा इंग्रजी भाषेत जन्मसोहळ्या निमित्त विशेष प्रार्थना व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.

टॅग्स :ChristmasनाताळPune Campपुणे कॅम्पPuneपुणे