शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांच्या वाहनांवर झळकताय कलमांचे चॉइस नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:14 IST

दुचाकीसाठी ३०२ हवा असेल तर ५ हजार आणि चारचाकीसाठी या नंबरची फी म्हणून सुमारे ५० हजार रुपये आकारले जात आहेत.

ठळक मुद्दे३०२ नंबरच्या अनेक गाड्या : मोबाइल नंबरचे शेवटचे आकडेही आहेत सेम

पुणे : आपल्या वाहनांना लकी नंबर मिळावा म्हणून एक हजार रुपयांपासून अगदी लाखोंच्या घरात फी भरल्याची अनेक उदाहरणे शहरात आहेत. स्वत:ला भाई, दादा, भाऊ, युवा नेता म्हणून मिरवून घेणाऱ्यांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे. मात्र आता लकी नंबरची ही क्रेझ वकिलांमध्ये देखील वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रक्टीस करताना वकील बऱ्याचदा कोणत्याही एका प्रकारच्या केसेस घेत असतात. गुन्हेगारी, जमिनीचे वाद, कौटुंबिक हिंसाचार हे त्यातील काही महत्त्वाचे दावे. त्यामुळे त्या प्रकारचे खटले घेणारे वकील त्यांच्या वाहन आणि मोबाइलसाठी गुन्ह्याच्या कलमांप्रमाणे लकी नंबर चॉईस करीत आहे. या सर्वांत ३०२ हा नंबर अनेक वकिलांच्या वाहनांवर दिसत आहे. तसेच मोबाइलचे शेवटचे आकडे देखील ३०२ असे आहेत. या लकी नंबरसाठी वकील हजारो रु पये मोजण्यासाठी तयार असतात. खूनाच्या प्रकरणात ३०२ हे कलम वापरण्यात येते. गेल्या काही दिवसांत शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. क्षुल्लक कारणांवरून खून झाल्याचे प्रकार शहरात घडत आहे. त्यामुळे ३०२ या कलमाखाली प्रकरणे वाढत असल्याचे या नंबरला पसंती असल्याचे एका वकिलाने सांगितले. तर खूनाच्या खटल्यांचे कामकाज पाहणारे वकील म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी. तसेच आपल्या गाडीचा नंबर सर्वांना सहज लक्षात रहावा म्हणून देखील हा नंबर निवडला जात आहे. भारतीय संविधानातील हे एक महत्त्वाचे कलम आहे. त्यामुळे या कलमाविषय प्रॅक्टीस करणारे वकील म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी. तसेच इतर वकिलांना लक्षात राहावे, म्हणून मी माझ्या दुचाकीसाठी ३०२ हा नंबर चॉईस केला. तसेच माझ्या मोबाइलनंबरचे शेवटचे आकडे देखील ३०२ आहे, अशी माहिती अ‍ॅड. जयपाल पाटील यांनी दिली. ...................................  चारचाकीसाठी ५० हजार फी  पुणे आरटीओमध्ये १ नंबरसाठी एका महागड्या गाडीच्या मालकाने तब्बल १२ लाख रुपये फी भरली आहे. तर दुचाकीसाठी ३०२ हवा असेल तर ५ हजार आणि चारचाकीसाठी या नंबरची फी म्हणून सुमारे ५० हजार रुपये आकारले जात आहेत. असे असतानाही शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात अनेक वाहनांना हा नंबर पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरadvocateवकिल