शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीत घरफोड्या करून ४५ तोळे लंपास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:48 IST

घोडेगावजवळील चिंचोली कोकण्यांची येथे दोन घरांमध्ये पहाटे चारच्या दरम्यान घरफोड्या झाल्या असून येथून ४५ तोळे सोने व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. याच रात्री साडेअकराच्या सुमारास दोन व्यक्तींकडून बळजबरीने गळ्यातील सोनाच्या चेन काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

घोडेगाव : घोडेगावजवळील चिंचोली कोकण्यांची येथे दोन घरांमध्ये पहाटे चारच्या दरम्यान घरफोड्या झाल्या असून येथून ४५ तोळे सोने व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. याच रात्री साडेअकराच्या सुमारास दोन व्यक्तींकडून बळजबरीने गळ्यातील सोनाच्या चेन काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. येथे कांताराम सावळेराम घोलप सकाळी उठले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले़ त्यांना कपाटातील दागिने व पैसे चोरीस गेल्याचे दिसले़ घराचा प्रमख दरवाजा उघडून चोरांनी दागिने व रोख १0 लाख ७४ हजार ६00 रुपयांचा ऐवज लंपास केले होते. तसेच शेजारी राहणाऱ्या जिजाबाई तुकाराम कानसकर यांच्या घरातही घरफोडी केली़ दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ४३ हजार ३0 रुपयांचा ऐवज चोरी झाला़ त्यांच्याही घरातील सुटकेस व एक लोखंडाची पेटी शेतात नेऊन फोडली़ याच घराजवळील सागर दिनकर खिलारे यांच्या घराची कडी काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ परंतु घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पसार झाले. घोडनदीच्या पुलाजवळ मंगेश कोकणे व अनिल आगळे या दोन तरुणांना अडवून मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या चेन हिसकावून घेतल्या़ यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या चार चोरांनी अडविले असल्याचे या दोघांनी सांगितले़ या चारही घटनेत १४ लाख १७ हजार ६३0 रुपयांचा माल लंपास केला आहे़दरम्यान घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांनी पहाटे पोलिसांसह दोन्ही ठिकाणी पाहणी केली़ ताबडतोब सगळीकडे नाकाबंदी करून तपाससुरू केला़ पुण्याहून श्वानपथक बोलावून चोरट्यांचा मागकाढण्याचा प्रयत्न केला़ घरातील कपाटे व वस्तूंवर पडलेले हाताचे ठसे घेतले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे