शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा चिमुकलेच चिमुकलीसाठी न्याय मागतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:55 IST

कठुअा तसेच उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच कठुअा घटनेतील चिमुरडीच्या न्यायाच्या मागणीसाठी अाज विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या हाेत्या. अांदाेलकांनी काहीकाळ टिळक रस्ता बंद करण्याचाही प्रयत्न केला.

ठळक मुद्देविविध संघटनेच्यावतीने एस.पी. महाविद्यालयासमाेर अांदाेलनकाही काळ रस्ता अडविण्याचा केला प्रयत्न

पुणे : चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, वी वाॅन्ट जस्टीस, हल्ला बाेल हल्ला बाेल, इस शासन पे हल्ला बाेल, अश्या घाेषणा देत कठुअा घटनेतील चिमुकलीसाठी न्यायाची मागणी करण्यात अाली. माेठ्यांसाेबतच चिमुकले जम्मूतील कठुअा मध्ये नराधमांच्या वासनेची शिकार झालेल्या चिमुकलीच्या न्यायासाठी हाक देत हाेते. चिमुकलेच चिमुकलीच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले हाेते.     कठुअा अाणि उन्नाव येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी पुण्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध अांदाेलनाचे अायाेजन एस.पी. महाविद्यालयाच्या समाेर करण्यात अाले. यात विविध सामजिक संघटनांच्या कार्यकत्यांबराेबरच चिमुकलेही माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. कठुअा घटनेतील चिमुकलीला न्यायाची मागणी हे चिमुकले यावेळी करत हाेते. सकाळी 11 च्या सुमारास या अांदाेलनाला सुरुवात करण्यात आली.  भारतीय महिला शक्ती केंद्र,  संभाजी ब्रिगेड,  राष्ट्रीय दलित पॅंथर, फुले शाहू अांबेडकर विचार मंच, कम्युनिस्ट पार्टी, अाराेग्य फाऊंडेशन,  एमअायएम, फॅमिली काेर्ट बार असाेसिएशन,  रिपब्लिकन युवा माेर्चा अादी संस्था, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक या अांदाेलनात सहभागी झाले हाेते. हातात बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी करणारे, तसेच चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे असे लिहिलेले पाेस्टर घेण्यात अाले हाेते. घाेषणा दिल्यानंतर काही काळ रास्ता राेकाे करुन रस्त्यातच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न अांदाेलकांनी केला. मात्र पाेलीसांनी अांदाेलकांना बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.

    यावेळी बाेलताना ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या प्रभावामुळे बलात्काराचे गुन्हे करणाऱ्यांना माेकाट साेडलं जात असल्याचे दिसून येत अाहे. बलात्काऱ्यांवर गुन्हे दाखल हाेऊ नये म्हणून भाजपचे मंत्री रस्त्यावर येऊन अांदाेलने करत अाहेत. इतकी भयानक अराजकता व संवेदनशुन्यता कधीच निर्माण झाली नव्हती. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अाम्ही येथे जमा झाले अाहाेत. देशातली जनता या सरकारला खाली खेचून बलात्काऱ्यांना पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही.    संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे म्हणाले, बलात्काऱ्यांच्या पाठीशी जर भाजपचे नेते, कार्यकर्ते उभे राहत असतील तर अाम्हाला लाज वाटते की अाम्ही अश्या नालायक सरकारला निवडून दिलं, जे नागरिकांना तसेच मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही. या देशात महिला सुरक्षित नाहीत तसेच सामाजिक अशांतता निर्माण झाली अाहे. कठुअा व उन्नाव घटनेतील अाराेपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी.

टॅग्स :PuneपुणेKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणS P Collegeस प महाविद्यालय