शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

By नितीन चौधरी | Updated: April 11, 2024 18:52 IST

अजित पवार, राज ठाकरे हे आमच्यासोबत असल्याने देशात मोदी लाट निर्माण होऊन महाराष्ट्रात सर्व जागा जिंकून महायुती निवडून येईल

पुणे: “कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम जगभर पोचले आहे. मात्र, राज्यात त्यावेळी मोदी यांच्यावर घरात बसून टीका करण्यात आली. मोदी त्याकडे लक्ष देत नव्हते. मात्र, मोदींनी वक्रदृष्टी केल्यास काय होईल? फेसबुकवरून लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल,” असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. मोदींवरील टीकेवरून त्यांनी हाथी चला बाजार... ही म्हण उद्धृत करीत ठाकरे यांना नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यानेच लोकांच्या मनातील युती सरकार स्थापन केल्याचा दावा करत शिंदे यांनी, ‘हे सरकार पडणार,’ अशी टीका त्यावेळी सुरू झाल्याचे सांगितले. आता मात्र, ही टीका बंद झाली आहे. विकासाचे व्हिजन घेऊनच देश व राज्य विकास प्रगतीकडे वाटचाल करत आहे. हे मुद्दे लक्षात घेऊनच अजित पवारदेखील युतीत सामील झाले आहेत. आता मनसेनेदेखील याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देशात मोदी लाट निर्माण झाल्याचे सांगत राज्यात ४८ पैकी ४५ जागा जिंकून महायुती निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदानात बुथ कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत मतदारांना मतदानासाठी बाहेर काढावे लागेल, असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. विरोधक मतदारांची दिशाभूल करतील. त्याकडे लक्ष ठेवावे लागेल. त्याला उत्तर देताना आपल्याकडून बोलण्यात काहीही चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. अजित पवारांना याचे अनेक अनुभव आले आहेत. असे शिंदे यांनी सांगितल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. पवार यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवावी असेही ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारने अनेक निर्णय सामान्यांसाठी घेतले असून मतदारांसमोर जाताना कार्यकर्त्यांना खाली मान घालण्याची काम ठेवलेले नाही असे सांगून शिंदे यांनी मते मागताना मतदार आपल्याला रागावेल. मात्र तो आपल्यालाच मतदान करेल असा विश्वासही कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा